डोंबिवलीत आम आदमी पार्टी झाली सक्रीय - AAM Admi Party got active in Dombivali ahed of Municipal Elections | Politics Marathi News - Sarkarnama

डोंबिवलीत आम आदमी पार्टी झाली सक्रीय

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना जाग आली असून पक्षाची कार्यालये विविध प्रभागात नव्याने सुरु होत असतानाच आम आदमी पार्टीही कल्याण डोंबिवलीत सक्रीय होत आहे. 

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक येत्या दोन तीन महिन्यात लागण्याची शक्‍यता आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना जाग आली असून पक्षाची कार्यालये विविध प्रभागात नव्याने सुरु होत असतानाच आम आदमी पार्टीही कल्याण डोंबिवलीत सक्रीय होत आहे. 

रविवारी डोंबिवलीत आम आदमी पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. दिल्लीत बदल होऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही हाच मुद्दा घेऊन आम आदमी पार्टी रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत आम आदमी किती मते स्वतःकडे खेचण्यात यशस्वी होते हे पहावे लागेल.

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दोन तीन महिन्यात लागण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. शिवसेना भाजपाच्यावतीने लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रभागा प्रभागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मनसेनेही विविध विकासकामांच्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

अशा पद्धतीने सर्वच पक्ष कल्याण डोंबिवलीत सक्रीय झाले असताना आता दिल्लीतील सक्रीय पक्ष आम आदमी पार्टीही कल्याण डोंबिवलीत सक्रीय होऊ पहात आहे. काही महिन्यांपूर्वीच कल्याण येथे आम आदमी पार्टीची बैठक पार पडली होती. त्यावेळी महापालिका निवडणुकांत सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नव्या वर्षात डोंबिवली मानपाडा चौकात रविवारी आम आदमी पार्टीने आपल्या मध्यवर्ती कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन केले. आम आदमी पार्टीचे सहसचिव रुबेन मस्करहन यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी ऍड. धनजंय जोखदंड, प्रविण पुरले, आकाश वेदक यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दिल्लीत बदल होऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही? 200 युनीट वीज बिल मोफत, 20 हजार लिटर पाणी बिल मोफत, शिक्षणाचा खर्च मोफत, रुग्णालय - शस्त्रक्रिया व औषधांचा खर्च मोफत, महिला व विद्यार्थी बस सेवा मोफत. हे जर दिल्लीत होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल त्यांनी केला आहे. हाच मुद्दा घेऊन निवडणूकीच्या रिंगणात आम आदमी उतरणार आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत आम आदमी पार्टी किती मतांची खेचाखेची करुन पालिकेत आपले स्थान निर्माण करते हे पहावे लागेल.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख