अंबरनाथमध्ये काँग्रेसला धक्का; तीन माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये - Three congress ex corporators enter Ncp In Ambarnath | Politics Marathi News - Sarkarnama

अंबरनाथमध्ये काँग्रेसला धक्का; तीन माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रुती सिंग, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, प्रकाश पाटील, उत्तर भारतीय सेलचे शहराध्यक्ष मनोज सिंग आणि युवक कॉंग्रेस सरचिटणीस संतोष दबडे या पाच जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कॉंग्रेसच्या एका नगरसेविकेसह तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत सर्वांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या काळात अंबरनाथमध्ये कॉंग्रेसला धक्का बसल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसच्या नगरसेविका श्रुती सिंग, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, प्रकाश पाटील, उत्तर भारतीय सेलचे शहराध्यक्ष मनोज सिंग आणि युवक कॉंग्रेस सरचिटणीस संतोष दबडे या पाच जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादीची ध्येय धोरणे आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यपद्धतीमुळेच पक्ष प्रवेश केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

शहरात पूर्वीपासून बळकट असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कॉंग्रेसचे नगसेवक, माजी नगरसेवक येऊ लागल्याने पक्ष अधिक मजबूत होत आहे. अंबरनाथमधील प्रभागांत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने सर्व प्रभागांत उमेदवार उभे करणार असून नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक धनंजय सुर्वे आणि कबीर गायकवाड, तसेच कमलाकर सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीनंतर महाआघाडी!
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे महाआघाडी सरकार सत्तेवर असले; तरी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवून नंतर आघाडी, महाआघाडीबाबत निर्णय घ्यावा असे सूतोवाच शहराध्यक्ष पाटील यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख