आमदार कथोरेंच्या गाडीला अपघात; दोन जण जागीच ठार - Mla Kisan Kathore Car Met with an accident | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार कथोरेंच्या गाडीला अपघात; दोन जण जागीच ठार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला रायते येथील वैष्णवी देवी मंदिर जवळ काल अपघात झाला असून या अपघातात दोन मोटारसायकल स्वार मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाले आहेत. 

ठाणे : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला रायते येथील वैष्णवी देवी मंदिर जवळ काल अपघात झाला असून या अपघातात दोन मोटारसायकल स्वार मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाले आहेत. 

सदरचा अपघात सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान घडला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा  मुरबाड मतदार संघातील म्हसकळ येथे आयोजित केला होता. हा मेळावा संपल्यावर आमदार किसन कथोरे हे बदलापूर येथे निघाले असताना. दहागाव रस्त्याने रायते गावाच्या दिशेने येत असताना वैष्णवी मंदिराजवळ समोरून मोटारसायकलने आमदार किसन कथोरे यांच्या गाडिला जोरदार धडक दिली. 

या अपघातात मोटारसायकलवर बसलेले तरुण तरुणी दोघं जागीच ठार झाले,हे दोघही डोंबिवली जवळील गोळवली आणि पिसवली येथे राहणारे असून त्यांची नावे अमित सिंग आणि सिमरन सिंग अशी आहेत,या दोघांचे मृतदेह उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून,या अपघातात आमदार किशन कथोरे  थोडक्यात बचावले असून त्यांचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख