अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची मतदारांना मारहाण

काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं मतदारांना मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात बुधवारी हा प्रकार घडला. सुरेंद्र यादव असं या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचं नाव असून तो आधीपासून गुंड प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जातो.
Beating
Beating

अंबरनाथ : काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं मतदारांना मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात बुधवारी हा प्रकार घडला. सुरेंद्र यादव असं या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचं नाव असून तो आधीपासून गुंड प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जातो. 

यादव हा मागील निवडणुकीतही तडीपार असतानाही निवडून आला होता. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. या यादीत अनेक नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. याबाबत मतदारांनी हरकती घेतल्या असून पालिकेच्या वतीनं प्रभागात जाऊन पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. 

अंबरनाथ पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या लक्ष्मण यादव यांचं नाव प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेल्यानं त्यांनीही अशाच प्रकारची हरकत घेतली होती. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ते याबाबतची माहिती देत असतानाच या भागाचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव आणि त्याच्या मुलाने लक्ष्मण यादव आणि बिरव यादव या दोघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही दुखावत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरेंद्र यादव आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com