आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले; पित्याचाही आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी आणि तीनही मुलांचे मृतदेह पाहून पतीनेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे
The body of a mother with three children was found in the forest of Bhiwandi
The body of a mother with three children was found in the forest of Bhiwandi

भिवंडी : गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह भिवंडी तालुक्‍यातील उंबरखांड पाच्छापूर जंगलात सडलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेले आढळून आले. पत्नी आणि तीनही मुलांचे मृतदेह पाहून पतीनेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना भिवंडी पोलिसांनी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे.मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे 

या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी नोंद घेत तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी शहापूर तालुक्‍यातील खर्डी नजीकच्या जंगलात अशाच प्रकारे तिघांचे मृतदेह आढळून आले होते. मात्र, पोलिस तपासाअंती या तिघांनी तंत्र मंत्र विद्या शिकण्यासाठी तसेच, अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता अशाच प्रकारे झाडाला लटकलेल्या अवस्थेतील चारही मायलेकांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या प्रकरणी पडघा व भिवंडी तालुका विशेष पोलिस सखोल तपास करीत आहेत. 

श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांची पत्नी रंजना (वय 30), मुलगी दर्शना (वय 12), रोहिणी (वय 6) आणि मुलगा रोहित (वय 9) असे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत. संशयास्पद आणि गूढ अशा घटनेची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

भिवंडी तालुक्‍यातील उंबरखांड गावातील श्रीपत बांगारे यांनी 21 ऑक्‍टोबर रोजी वरील चौघे माय-लेकरं बेपत्ता झाल्याची तक्रार पडघा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र गुरुवारी (ता. 10 डिसेंबर) दुपारी श्रीपत यांचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना एका झाडावरून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याने पहिले असता झाडाला सडलेल्या अवस्थेतील चार मृतदेह आढळून आले. या मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांमुळे त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपत यांना दिली. 

त्यानंतर पत्नी आणि तीन मुलांच्या मृत्यूची बातमी मिळताच श्रीपत यांनी स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण विभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह भिवंडी व पडघा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com