भिवंडीत शिवसेना भाजपची छुपी युती; पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा - BJP's Sandhya Naik Elected as Chairman Bhivadi Panchayat Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडीत शिवसेना भाजपची छुपी युती; पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा

शरद भसाळे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

भाजप पक्षाला शह देण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन राज्यात महाआघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले . मात्र भिवंडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी छुपी युती केल्याचे  भिवंडी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यात खासदार कपिल पाटील यांना यश आले आहे. 

भिवंडी  : भाजप पक्षाला शह देण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन राज्यात महाआघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले . मात्र भिवंडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी छुपी युती केल्याचे  भिवंडी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यात खासदार कपिल पाटील यांना यश आले आहे. 

शिवसेनेचे पंचायत समिती मध्ये संख्याबळ सर्वाधिक असूनही पंचायत समितीच्या सभापदी पदी भाजपच्या संध्या नाईक बिनविरोध निवडून आल्या. आहेत. त्यामुळे भाजप पक्षाच्या कार्यकर्तेनी जल्लोष केला आहे.भाजप आणि सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये झालेली ही राजकीय तडजोड सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जिव्हारी लागत आहे.

भिवंडी पंचायत समिती मध्ये सेने भाजपा चे संख्याबळ समसमान झाल्याने चिठ्ठी वर भाजपच्या सभापती विराजमान झाल्या होत्या. परंतु त्यानंतर स्थानिक भाजपा सेना नेत्यांच्या तडजोडीत रविना जाधव यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेचे विकास भोईर हे अवघे चार महिन्याच्या औट घटकेचे सभापती पद उपभोगून राजीनामा दिला त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी आज दुपारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सभापती निवडणूक पार पाडली.

या निवडणुकीत भाजपच्या संध्या नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांनी संध्या नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे. 42 सदस्य असलेल्या भिवंडी पंचायत समितीत शिवसेना 20 , भाजपा 19 ,काँग्रेस 2 ,मनसे 1असे पक्षीय बलाबल आहे. पंचायत समितीत महाआघाडीचे एकूण 23 सदस्य असतांनाही अवघ्या 19 सदस्य असलेल्या भाजपच्या गळ्यात शिवसेनेने सभापती पदाची बिनविरोध माळ  घातली त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते तीव्र नाराज झाले आहेत. खासदार कपिल पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यात त्यांना यश आले आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख