'या' मागणीमुळे सेना भाजप पुन्हा येणार आमने सामने 

प्रताप सरनाईक यांच्या मागणीने आता सेना भाजप समोर समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा आरोप केल्याने आता शिवसेनाही त्या आरोपाची परतफेड करणार असल्याचे दिसते आहे.
Pratap Sarnaik - Kirit Somaiya
Pratap Sarnaik - Kirit Somaiya

विरार : मीरा भाईंदर Mira-Bhyander पालिका हद्दीत युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांधलेली सार्वजनिक शौचालये सीआरझेड मध्ये बांधून सीआरझेड CRZ आणि कांदळवन पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या  KItir Somaiyya आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमनेसामने येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. Shivsena MLA Pratap Sarnaik Demands To register offence aganist Kriti Somaiyyas wife

युवक प्रतिष्ठानच्या संचालिका आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पालिका हद्दीत १६ ठिकाणी उभारलेली शॉचालये हि सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात बांधली आहेत यामध्ये त्यांनी राजकीयशक्तीचा वापर करून तसेच खोटी कागद पत्रे सादर करून सादर कामाची बिले घेतली आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, कारण नगरविकास मंत्रालयाने पालिकेकडे मागितलेल्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे ही सदरची बांधकामे  सीआरझेड क्षेत्रात झाली आहेत. याकामी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर केल्याचेही स्पष्ट दिसत असल्याने दोघांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thacekray यांच्या कडे केली आहे.

प्रताप सरनाईक यांच्या मागणीने आता सेना Shivsena भाजप BJP समोर समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा आरोप केल्याने आता शिवसेनाही त्या आरोपाची परतफेड करणार असल्याचे दिसते आहे. Shivsena MLA Pratap Sarnaik Demands To register offence aganist Kriti Somaiyyas wife
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com