शहापूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये दारूच्या बाटल्या...सिगारेटी - Patients carrying Wine and Tobacco in Covid Centres in Thane District | Politics Marathi News - Sarkarnama

शहापूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये दारूच्या बाटल्या...सिगारेटी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कोविड सेंटर मध्ये कचरा करणे,बाथरूम मधील नळ चालू ठेवणे, डॉक्टराना त्रास देणे, असे प्रकार करून कोरोना योद्ध्यांना त्रास दिला जात असून याबाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून ही काही कारवाई केली जात नसल्याने कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, व कर्मचारी काम सोडून जाणार असल्याचा अर्ज वैद्यकीय अधिक्षक डॉ.बनसोडे यांच्या कडे देण्यात आला आहे

शहापूर : येथील कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहेत. शहापूर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी येणारे काही रुग्ण आपल्याबरोबर विदेशी मद्य, तंबाखू, सिगारेट अशा वस्तू घेऊन येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथील सर्व डाॅक्टर व कर्मचारी काम सोडून देण्याच्या तयारीत आहेत. 

शहापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून यावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल, पोलीस, प्रशासन  झटत आहेत. असे असताना दुसरीकडे नागरिकांच्या बेफीकीरीला प्रशासनाला सामोरे जावे लागत आहेत. हे कोरोना युद्धे दिवसरात्र झटत असतांना  काही कोविड रुग्ण दाखल होतानाच आपल्या कपड्यांच्या बॅग मध्ये तांबाखू, गुटखा, सिगारेट, व विदेशी मदय, घेऊन येतात, असे उघड झाले आहे.  येथील सफाई कर्मचारी किंवा डॉक्टरांनी त्यांना अडवल्यास अरेरावी करुन धमक्याही दिल्या गेल्याचे समोर आले आहे. 

कोविड सेंटर मध्ये कचरा करणे,बाथरूम मधील नळ चालू ठेवणे, डॉक्टराना त्रास देणे, असे प्रकार करून कोरोना योद्ध्यांना त्रास दिला जात असून याबाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून ही काही कारवाई केली जात नसल्याने कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर, व कर्मचारी काम सोडून जाणार असल्याचा अर्ज वैद्यकीय अधिक्षक डॉ.बनसोडे यांच्या कडे देण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख