पोलीस दलातील जुळ्या  भावांचा कोरोनामुळे मृत्यू  - Twin police Constables Died due to Corona in Ambernath | Politics Marathi News - Sarkarnama

पोलीस दलातील जुळ्या  भावांचा कोरोनामुळे मृत्यू 

श्रीकांत खाडे
शुक्रवार, 31 जुलै 2020

पोलीस दलात कार्यरत असलेल्या जुळ्या भावांचा आठ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथला घडली आहे. दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके या  जुळे भाऊ असलेल्या पोलिसांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे

अंबरनाथ : पोलीस दलात कार्यरत असलेल्या जुळ्या भावांचा आठ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथला घडली आहे. दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके या  जुळे भाऊ असलेल्या पोलिसांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे.

दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते. हे दोघेही  भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते, दोघांनीही आपले प्रशिक्षण एकत्रच पूर्ण केले होते. दिलीप  घोडके यांचा २० जुलै, तर जयसिंग यांचा २८ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. या जुळ्या बंधूंच्या मृत्युमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. 

राज्यात कोरोनाचे ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत.आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे.आज ११,१४७ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. रुग्णांची एकूण संख्या एकूण संख्या आता 411798 अशी झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख