ठाण्यात घरोघरी ताप सर्वेक्षण, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग; मालेगाव केस स्टडीविषयीही चर्चा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी आॅक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याची गरज असून त्यामधून तापसदृश्‍य किंवा कोरोनासदृश्‍य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलातंरित करण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या आयुक्तांनी दिले आहेत
Contact Tracing will be Started in Thane corporation Area
Contact Tracing will be Started in Thane corporation Area

ठाणे : घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पंकज आशिया यांनी मालेगावमध्ये केलेल्या कामाची माहिती बैठकीत दिली. बैठकीस सनदी अधिकारी आणि कोव्हिडसाठी नियुक्त विशेष अधिकारी रंजीत कुमार हेही उपस्थित होते.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी आॅक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याची गरज असून त्यामधून तापसदृश्‍य किंवा कोरोनासदृश्‍य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलातंरित करण्यात यावे, असे सांगून फिव्हर ओपीडीसह कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगला प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश आयुक्त सिंघल यांनी या वेळी दिले.

प्रभावीपणे अंमलबजाणीचे निर्देश

'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत बाजारपेठा उघडण्यात आल्या असून पी १, पी २ प्रमाणे कार्यवाही होते की नाही, याची पोलिसांशी समन्वय साधून प्रभावीपणे अंमलबजाणी करावी, अशा सूचना आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. प्रभाग समिती अंतर्गत पालिकेच्या शाळा असतील तर त्या क्वारंटाईन सेंटरसाठी वापरव्यात, असेही सिंघल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com