भाजपला नितीशकुमार चालतात मग, उद्धव का चालत नाहीत ?  - If Nitish Kumar is running for BJP then why Uddhav is not running? | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला नितीशकुमार चालतात मग, उद्धव का चालत नाहीत ? 

प्रकाश पाटील 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

अधिक जागा आम्हाला मिळाल्या तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी चालेले अशी भूमिका भाजपने 2014 मध्ये का घेतली नाही. अजून बिहारचे निकाल लागायचे आहेत. तोवरच भाजप म्हणते की कमी जागा मिळाल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील म्हणून ! भाजपच्या या दुटप्पी भूमिकेचे राज्यातील अकरा कोटी जनतेला आश्‍चर्य वाटले असेल. शिवसेनेविषयी भाजपने मन मोठे केले नाही हेच सत्य आहे. 

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दोनतीन दिवसात मतदान होत आहे. नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे नाही याची भीष्म प्रतिज्ञा चिराग पासवान यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते, घोटाळ्यात तुरूंगवास भोगस असलेले लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव हे ही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कडाडून हल्ला चढवित आहेत. 

एकंदर बिहारचे राजकारण आणि हवा कोणत्या बाजूने असेल तर ती तेजस्वी यांच्या बाजूने दिसून येत आहे. तसे मीडियाचेही म्हणणे असले तरी येथे कोणाला स्पष्ट बहुमत मिळेल हे काही सांगता येत नाही. बिहारच्या राजकारणाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर एक चित्र दिसून येत आहे की या राज्यात दोन युवा नेत्यांनी नितीशकुमारांना चारीमुंड्या चित्त केले आहे.

PM Narendra Modi concludes US visit, thanks Trump and Americans for  exceptional hospitality - The Economic Times

तेजस्वी तर बिहारचे हिरो ठरत आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ चिराग पासवान हे ही चांगली बॅटींग करीत आहेत. याचाच अर्थ असा आहे, की हे दोन्ही युवा चेहरे पुढे आले आहेत. तेजस्वी तर त्यांच्यावर हल्ला करताना एक गोष्ट वारंवार सांगत आहेत, की नितीशकुमार थकले आहेत. त्यांच वय झालं आहे. आता तुम्ही राजकारणातून निवृत्त व्हा असाच संदेश ते त्यांना देते आहेत. 

एकीकडे तेजस्वी तर दुसरीकडे चिराग त्यांना नामोहरण करीत आहेत. चिराग हे कोणत्याही परिस्थितीती नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास तयार नाहीत. खरंतर त्यांचे राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. तसाच तो तेजस्वी यांचाही आहे. मुळात या सर्व घडामोडी लक्षात घेता भाजपने जी भूमिका या राज्यात घेतली आहे. त्यांचा संबंध महाराष्ट्राशी जोडावा लागेल. 

गेल्या पंधरा वर्षापासून नितीशकुमार हे मुख्यमंत्री आहेत. पण, बिहारचा म्हणावा तसा विकास झाला नाही. बिहारी माणूस स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात का जातो ? का स्थलांतर करतो याचा विचार ना नितीशकुमार यांनी केला ना लालू प्रसाद यांनी केला.

Nitish Kumar needs to rethink prohibition in Bihar, and soon! - The Daily  Guardian

जर येथे उद्योग व्यवसाय सुरू झाले असते. लोकांच्या हाताला काम मिळाले असते तर तो कशाला महाराष्ट्रात आणि मुंबईत जाईल याचा विचार कधीच झाला नाही ! बिहारी माणसाला 19 लाख नोकऱ्या देण्याचे जे आश्वासन दिले जात आहे. खरेतर ती प्रत्येक बिहारीच्या डोळ्यात धुळफेक आहे. 

जर बिहारी माणसांसाठी इतकाच कळवळा असता तर राज्यातील जनतेला असे दारिद्य्राचे आणि हालाकीचे जीवन जगावे लागले नसते. याचा अर्थ येथे कॉंग्रेसची सत्ता असताना खूप मोठे काम झाले असे म्हणता येत नाही. लालू असो ती नितीशकुमार सगळेच माळेचे मणी आहेत. भाजप चिराग पासवान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितीशकुमारांना संपवू पाहत आहेत. हे लोकांना कळत नाही की काय ? निवडणुकीचे निकाल बाहेर आल्यानंतर मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे. असो. 

या राज्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी जर काही जादू केली तर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो. नितीशकुमार सोडले तर भाजपकडे नाव घेण्यासारखा एकही नेता येथे नाही. भाजप म्हणते की येथे जरी भाजपला अधिक जागा मिळाल्या आणि जेडीयूूला कमी जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच असतील. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून ते केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत सगळेच एकच सुरात हे सांगत आहेत की नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार. 

वास्तविक, ज्या नितीशकुमारांना पंतप्रधान हा सेक्‍यूलर चेहर हवा होता. त्याच नितीशकुमारांना भाजप मुख्यमंत्री बनवायला तयार याचे आश्‍चर्य वाटते असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले आहे. 

Sakal Times | Latest Maharashtra News, Breaking News India, Pune News,  Mumbai News, World News, Technology, Finance, Cricket

याचा अर्थ असा आहे की भाजपने रणनिती तयार केली आहे. नितीशकुमारांना लोक कंटाळल्यामुळे भाजपला अधिक जागा मिळतील. तसे झाले तरी भाजप नितीशकुमारांना मुख्यमंत्री करेल याची गॅरेंटी काय आहे.जेडीयूला कमी जागा मिळाल्या तरी त्यांना मुख्यमंत्री करण्यास तयार असलेल्या भाजपने मग महाराष्ट्रात शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय का केला हा ही प्रश्‍न आहे. 

2014 मध्ये काही कारण नसताना भाजपने शिवसेनेशी युती तोडली. राष्ट्रवादीने कॉंग्रेसशी का आघाडी तोडली हा प्रश्‍नही गुलदस्त्यात आहे. त्यावेळी मोदी लाटेचा भाजपला फायदा उचलायचा होता. जरी भाजपला वाटत असले तरी नितीला ते मान्य नव्हते. कारण भाजपने शिवसेनेविषयी बेईमानी केली होती. पंचवीस वर्षाचा हा मित्र बेईमान निघाला होता.

मोदी लाटेतही भाजप जर बहुमत घेऊन सत्तेवर आला नाही तर इतर निवडणुका विसरूनच जा ! 2019 मध्येही भाजपचे काय झाले हे पाहिलेच आहे. तोरसेकर निती कितीही दावा करू दे की शिवसेनेशी युती केली नसती तर भाजप बहुमतांने सत्तेवर आला असता याला काहीच अर्थ नाही. शेवटी जो जिंकतो तोच हिरो असतो. 

जो भाजप शिवसेनेबरोबर गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ हातात हात घेऊन लढला. ज्या हिदुंत्वावर दोघांची युती होती. त्याच भाजपला शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये असे वाटत होते. अधिक जागा आम्हाला मिळाल्या तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी चालेले अशी भूमिका भाजपने 2014 मध्ये का घेतली नाही. अजून बिहारचे निकाला लागायचे आहेत. तोवरच भाजप म्हणते की कमी जागा मिळाल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील म्हणून ! भाजपच्या या दुटप्पी भूमिकेचे राज्यातील अकरा कोटी जनतेला आश्‍चर्य वाटले असेल. 

Exclusive : अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा  खुलासा | eSakal

जर 2014 मध्ये जर भाजपने मोठे मन केले असते आणि शिवसेनेशी युती केली असती तर युतीला तीनशेपेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या आणि त्याचवेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला असता. पण, भाजपचे मन शुद्ध नव्हते. त्यांनी मोदी लाटेचा पुरेपार फायदा उचलण्याचा प्रयत्न केला.

परंतू झाले काय तर भाजपचा फज्जा उडाला. जर 2014 मध्ये युती झाली असती तर उद्धव ठाकरे नाराज झाले नसते आणि त्यांनी 2014 चे उट्टे 2019 मध्ये काढले नसते. युती टिकली असती. भाजपने मोठे मन केले असते तर आज भाजपचाही मुख्यमंत्री दिसला असता. 

भाजपचे मन संकूचित आहे. ज्या राज्यात भाजप प्रादेशिकपक्षाबरोबर युती करतो. त्यालाच गिळण्याच प्रयत्न करतो अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणूनच वाटते उद्धव ठाकरे यांनी भाजपला जी थप्पड मारली आहे. त्यांच्या चाली ओळखल्या आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविला.

भाजपला नितीशकुमार चालतात पण, उद्धव ठाकरे का चालत नाहीत ? हा प्रश्‍न अकरा कोटी जनतेला पडला असेल तर त्यामध्ये काही चूक आहे असे म्हणता येणार नाही. शिवसेनेविषयी भाजपने मन मोठे केले नाही हेच सत्य आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख