सचिन पायलटांसमोर जगनमोहन आदर्श का ? - Will Sachin Pilot become "Pawar, Banerjee, Reddy"? | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन पायलटांसमोर जगनमोहन आदर्श का ?

प्रकाश पाटील 
गुरुवार, 30 जुलै 2020

सचिन पायलटांविषयी थोडं सबुरीचं धोरण अर्थात जादूगारांने घेतले नाही. प्रारंभी भावनिक आवाहन केले. ते परत आले तर मी त्यांना मिठी मारेन म्हणणारे तेच गेहलोत पायलट यांना आता गद्दार, नालायक ठरवत आहेत. म्हणजेच त्यांची भाषा बदलली. काही असले तरी पायलट हे कॉंग्रेससाठी उपद्रवी ठरणार याची शंका घेण्याचे मुळी कारणच नाही.  

राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार आहे. ते ही अस्थिर बनलंय. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामुळं कॉंग्रेसला हादरा बसलाय. पण, या पक्षाच्या ज्येष्ठांना वाटतं की त्यांच्यामुळे काही फरक पडत नाही. जे पायलटांसारख्या तरण्याबांड नेत्याला लक्ष्य करंत आहेत. ती सर्व मंडळी सत्तरच्या पुढं आहेत. नेमकं पायलटांची बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार कॉंग्रेस की भाजप ! या प्रश्‍नाचं उत्तर आपआपल्यापरिनं राजकीय विश्‍लेषकांनी दिलं आहे. 

Sharad Pawar Slams BJP, Says It is Still Using All Means to ...

 

आपण देश आणि प्रत्येक राज्यातील सरकारे याचा विचार केला तर आज कॉंग्रेसकडे उजव्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राज्ये उरली आहेत. महाराष्ट्र असे एक राज्य आहे की तेथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. काहीवेळा ते विरोधात असतात. सोयीने एकत्र येतात. त्यामध्ये आता शिवसेनाही सहभागी झालीयं. जे बलाढ्य नेते कॉंग्रेसमध्ये आहेत आणि होते. त्यांचा त्यांच्या राज्यात दबदबा आहे, अशा नेत्यांचं नेहमीच कॉंग्रेसनं खच्चीकरण केलंय. त्याची किंमत पक्षश्रेष्ठींना कधीच कळली नाही. कळली तरी मुद्दाम दुर्लक्ष केलं गेलं. तुलनेनं सुमार नेत्यांनाच ताकद देण्याचा किंवा हुजरेगिरी करण्याऱ्यांना कॉंग्रेस दरबारी महत्त्व देण्यात आले हा इतिहास आहे. 

शरद पवार असतील किंवा ममता बॅनर्जी. हे नेते नेहमीच कॉंग्रेससाठी मोठे नेते होते. त्यांची त्यांच्या राज्यात ताकद आहे. ते जर बरोबर नसतील तर काय नुकसान होते याचा अनुभव कॉंग्रेस गेल्या काही वर्षापासून घेतेय. पवार किंवा बॅनर्जी हे मुळचे कॉंग्रेसचेच. पण त्यांच्यावर कॉंग्रेसने विश्वास ठेवला नाही. उलट दुय्यम नेत्यांना मानाची पदे दिली आणि प्रत्येक राज्यात झुंजी लावल्या. शेवटी स्वाभिमानी नेत्यांनी कॉंग्रेसला रामराम केला आणि आपआपल्या राज्यात ताकद दाखविली. पश्‍चिम बंगालमध्ये बॅनर्जी यांनी बलाढ्य अशा डाव्यांना धूळ चारत सत्ता मिळविली. आज त्या तितक्‍याच ताकदीने भाजपशी लढताहेत. 

Chidambaram's arrest depressing, says Mamata Banerjee - The Week

 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे ही मूळ कॉंग्रेसचेच. त्यांचे वडीलही कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते. वडलांच्या पश्‍चात जगनमोहन यांचेही पंख छाटण्याचा प्रयत्न कॉंग्रेस केला आणि ते बाहेर पडले. त्यांना तुरूंगातही टाकले. आज तेच रेड्डी बहुमत घेऊन मुख्यमंत्री बनले आहेत. 

महाराष्ट्रात जर शरद पवार यांच्याबरोबरीने चालले नाही तर कॉंग्रेसचं येथे काय होईल ? या पक्षाचे काही आमदार निवडून येतात ते पक्षावर नव्हे तर स्वत:च्या ताकदीवर. हे वास्तव आहे. कदाचित कॉंग्रेस नेत्यांना ते मान्यही होणार नाही. असो. आज पवार,बॅनर्जी, रेड्डी आणि पायलट यांचा विचार करू. या तिन्ही नेत्यांइतके पायलट ताकदवान नक्कीच नाहीत पण, त्यांना कॉंग्रेस कमी लेखतेय हे चुकीचं आहे. ज्या कॉंग्रेसमध्ये ते होते. त्यांच्यामागेही लोक आहेत. कोणी काही म्हणो.जातीची समीकरणे ही पाहली जातातच. 

उद्या पायलट हा मुद्दा घेऊन मैदानात उतरतील तेव्हा कॉंग्रेस अधिक खिळखिळी होऊ शकते. नाही म्हटले तरी पायलट यांची प्रतिमा क्‍लीन आहे. त्यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निकटवर्तीयांच्या मागे ईडी, आयकर, सीबीआय हातधुऊन लागले आहेत. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न कोण करते हे सांगण्याची गरज नाही मात्र, हे होत आहे. 

 

पायलट हे भाजपमध्ये जाणार नाहीत. तसे त्यांनीच स्पष्ट केलंय. ते स्वत:चा पक्ष स्थापन करणार नाहीत असेही सांगता येणार नाही. त्यांनी राष्ट्रवादीप्रमाणे स्वत:चा पक्ष स्थापन केला तर कॉंग्रेसचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते. त्यांना जाट, गुज्जर, रजपूत, मुस्लिम तसेच इतर छोट्या छोट्या जातींचाही पाठिंबा मिळू शकतो. जी कॉंग्रेसची शक्तीस्थळे आहेत त्याला तडा जाऊ शकतात. पायलट यांच्यावर अजून तरी कोणताही गंभीर आरोप झालेला नाही. राजस्थानात पुढच्या निवडणुकीपर्यंत आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करतील. कॉंग्रेस आणि पायलट यांच्यामध्ये मतांची विभागणी झाली तर फायदा कोणाला हे सांगण्याची गरज नाही. समजा पायलटांच्या पक्षाला उद्या ज्या जागा मिळतील. त्या जोरावर ते कोणाशीही आघाडी करू शकतात. म्हणजे किंगमेकर बनतील. 

Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy thanks social media warriors ...

अर्थात भाजपची पायलट यांना रसद मिळूही शकते. आज ते प्रचंड दुखावलेत. म्हणजेच ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतण्याची शक्‍यता धूसर आहे. गेहलोत हे राहुल-प्रियंकांचे अत्यंत विश्वासू नेते आहेत. त्यामुळे पायलट कॉंग्रेसपासून खूप लांब गेले आहेत. पायलटांनी पक्ष स्थापन केला तर देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडेल. ते केवळ राजस्थानातच कॉंग्रेसला धक्का देणार नाहीत तर राजस्थानासह हरियाना, मध्यप्रदेश किंवा जेथे गुज्जर समाज आहे. तो कॉंग्रेसपासून दूर जावू शकतो. गेहलोत हे जादूगार आहेत. त्यांची आतापर्यंत जादू चालली हे मान्य मात्र, प्रत्येकवेळी प्रयोग यशस्वी होतातच असे नव्हे. 

या राज्यातही भाजप आणि कॉंग्रेस जातीचे उमेदवार डोळ्यापुढे ठेऊनच यादी जाहीर करीत असते. या दोन्ही पक्षाने उमेदवार उभे करताना एका जातींमध्ये टक्करी लावल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी 33 ठिकाणी जाट उमेदवार दिले होते. आज भाजपकडे 26 जाट आमदार तर कॉंग्रेसकडे 15 आहेत. तसेच उर्वरित साठ उमेदवार एससी आणि एसटीचे आहेत. म्हणजे येथे जाट, गुज्जर, रजपूत, त्यानंतर ब्राह्मण, मुस्लिम आणि छोट्यामोठ्या जातीचा नंबर लागलो. 

1952 च्या निवडणुकीत 160 आमदारांपैकी 54 आमदार जाट होते. पुढे जशीजशी जागृती होऊ लागली तसे इतर जातीचे उमेदवार निवडून येऊ लागले. काही असले तरी आजही येथे या तीन जातीचा प्रभाव आहे. तो नाकारून चालत नाही. येथील जातीचा विचार केला तर पायलट हे तीन जातींबरोबर इतर छोट्यामोठ्या जातीची मोठ बांधण्यात यशस्वी होतात का हे पाहावे लागेल. म्हणूनच की काय कॉंग्रेसला भीती वाटते. सर्वाना बरोबर घेऊन चालणारा नेता म्हणून पायलट यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेले काम हीच त्याची पावती आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख