काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली; निवडणुकीतील आघाडीवरून ज्येष्ठ नेत्याचे टीकास्त्र

काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठनेत्यांनी अनेकदा पक्षनेतृत्वावरूनउघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Bengal Congress leader Adhir Ranjan criticise colleague Anand Sharma
Bengal Congress leader Adhir Ranjan criticise colleague Anand Sharma

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. यातील अनेक नेत्यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या आघाडीवरूनही एका नेत्याने थेट टीका केली आहे.

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवणुकीसाठी काँग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी आहे. या आघाडीमध्ये आता इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) सहभागी झाला आहे. त्यावरून जी 23 गटातील ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पश्चिम बंगालचे अध्यक्ष व खासदार अधिर रंजन चौधरी यांच्यावर निशाणा साधला आहे. शर्मा यांनी चौधरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पक्ष नेतृत्वावर टीका केल्याची चर्चा आहे. 

पक्षाची मुळ विचारधारा, गांधीवाद आणि नेहरूवादी धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा आत्मा आहे. आयएसएफसह अशा अन्य पक्षांसोबत काँग्रेसची आघाडी त्याच्याविरूध्द आहे. या मुद्यांवर काँग्रेस कार्य समितीमध्ये चर्चा व्हायला हवी होती, अशी नाराजी शर्मा यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची उपस्थिती आणि समर्थन लाजीरवाणे आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. 

त्याला चौधरी यांनीही ट्विटरद्वारेच उत्तर दिले आहे. हायकमांडशी चर्चा केल्यानंतरच आघाडीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सीपीआय (एम) आघाडीचे नेतृत्व करत आहे. भाजपला हरविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. काँग्रेसला आघाडीतील पूर्ण वाटा मिळाला आहे. आएसएफला डाव्या पक्षांकडून जागा दिल्या जाणार आहेत. आघाडीला जातीयवादी म्हणणे म्हणजे भाजपच्या अजेंड्याला समर्थन करण्यासारखे आहे, असा टोला चौधरी यांनी शर्मा यांना लगावला आहे. 

चौधरी यांनी शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांवरही टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्यात वेळ वाया घालवू नका. स्वत:साठी सोयीच्या जागा शोधण्याची धडपड थांबवा, अशी विनंतीही चौधरी यांनी केली आहे. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जी 23 गटाने यापूर्वीच अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. याच गटातील आनंद शर्मा यांनी निवडणुकीचे निमित्त साधून पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर थेट टीका केली आहे. 

जी 23 गटामध्ये शर्मा यांच्यासह गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी, राज बब्बर, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.  

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com