सचिन वाझे कोण निर्माण करतं?

पोलिस आयुक्तांच्या परवानगी शिवाय कुठलाच एन्काऊंटर होवू शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृह मंत्र्यांना भेटत. मधल्या अधिकाऱ्यांना बगल देत असत.अमाप पैसा,अमाप दहशत,अमाप प्रसिद्धी,अमाप अधिकार....असे वाझें कुणाला घाबरतील? त्यांच्यावर अंकुश कोणता?
Sachin Waze - Suresh Khopade
Sachin Waze - Suresh Khopade

चिन वाझेंच्या (Sachin Waze) करामती मुळे मुंबई पोलीस दल पुन्हा चर्चेत आले आहे व त्यावर आणखी चर्चा व्हायला पाहिजे. मुंबई रेल्वे पोलिस कमिशनर म्हणून तीन वर्षे नंतर उत्तर मुंबई विभागाचे अॅडिशनल पोलिस कमिशनर म्हणून मी अडीच वर्षे मुंबईत काम केले होते. निवृत्त झाले की तूम्हा लोकांना वाचा फुटते, असं म्हटलं जातं. पण मी नोकरीत असतानाही लिहीत व बोलत होतो. (Ex Maharashtra Police Office Suresh Khopde Blog on Sachin Waze Antilia case)

मुंबईतील वातावरण,तिथली गुन्हेगारी हे माझ्या सारख्याला अलिबाबाची गुहाच होती. त्या अभ्यासानुसार 'मुंबई जळाली भिवंडी का नाही"हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागात कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्यात मी एसपी म्हणून काम केले होतं. त्या आधारावर ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन कसे असावं यावर मी केलेल्या प्रयोगावर आधारित पुस्तक लिहिले होते. मुंबईत असताना ''महानगरातील पोलिस प्रशासन,उत्तर मुंबई प्रयोग" या नावाने पुस्तक प्रकाशित केले होतं. 

मुंबई शहरातील एन्काऊंटरस्, यावर मी खूप मटेरियल गोळा केलं होतं. मारल्या गेलेल्या बळींची सर्वांगाने माहिती गोळा करणे सुरू केले. दोन सस्पेंड असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट माझ्या हद्दीतील पोलिस स्टेशनला अॅटॅच केले गेले होते. मी ते संशोधन पूर्ण करू शकलो नाही. पण त्या विषयाचं भयानक वास्तव पुढे आले.आणि उत्तरही सापडले की इथली "गुन्हे न्याय व्यवस्था (criminal justice system)कालबाह्य आहे. ती बदलण्या ऐवजी तात्पुरता इलाज म्हणून गुन्हेगाराला तत्काळ शिक्षा देण्यासाठी तसेच मीडिया,जनता,विरोधक  यांना खुश करण्यासाठी एन्काऊंटर्स सुरू झाली. 

सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट! 
पोलिस आयुक्तांच्या परवानगी शिवाय कुठलाच एन्काऊंटर होवू शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृह मंत्र्यांना भेटत. मधल्या अधिकाऱ्यांना बगल देत असत.अमाप पैसा,अमाप दहशत,अमाप प्रसिद्धी,अमाप अधिकार....असे वाझें कुणाला घाबरतील? त्यांच्यावर अंकुश कोणता?  (Ex Maharashtra Police Office Suresh Khopde Blog on Sachin Waze Antilia case)

ख्वाजा युनूसचा काटा वाझेंनी ज्या पद्धतीने काढला होता ती फार अमानवी केस होतीय ते लपविण्या साठी केलेली धडपड अशीच पोरकट होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट (Encounter Specilists)  असे अघोरी व धोकादायक कृत्य कुणा साठी करत असावेत? समाजात शांतता सुरक्षितता राहावी म्हणून?एक कर्तव्य,जबाबदारी म्हणून? सत्याची चाड म्हणून? पुढाऱ्यांच्या सांगण्या वरून?.....की आणखी काही? 

माझ्या निरीक्षणावरून या पैकी कोणतेच उद्दीष्ट नाही नाही! दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तयार होत नाहीत! व्यक्तिगत फायदा (आर्थिक,मेहेरबानी,भावनिक...)असल्या शिवाय असे कृत्य करायला तयार होत नाहीत.
अंबानींच्या घरा समोर स्फोटके ठेवल्याने गृहमंत्री अगर मुख्यमंत्री  यांना काय लाभ होणार? सरकार अगर शिवसेनेला  कुठला लाभ होईल? असे काही होईल असे मला तरी वाटत नाही. वाझेना व्यक्तिगत मोठा लाभ होईल, असा त्यांचा होरा असावा.

अंबानी ही जगातली एक श्रीमंत व्यक्ती. त्यांच्या जीविताला असलेला धोका टाळल्याचे, गुन्ह्याचा तपास केल्याचे व आरोपीला बेड्या ठोकल्याचे श्रेय वाझेंना मिळणार होते. राज्य व केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शाबासकी मिळाली असती. अर्णवच्या केस मध्ये केंद्रीय गृह मंत्री नाराज होते ते खुश झाले असते. या सगळ्याचा फायदा ख्वाजा युनुसची जी केस त्यांच्या विरूद्ध चालू आहे त्यातून सुटण्यास मदत झाली असती, असा हेतू वाजेंच्या मनात असावा असे आतातरी वाटते. अर्थात पुढे वेगळेही काही निघू शकते. (Ex Maharashtra Police Office Suresh Khopde Blog on Sachin Waze Antilia case)

अशा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा राजकारणात दबदबा असतो. वाझे तर शिवसैनिकच होते. कोणत्याही सत्ताधारी नेत्याला तात्काळ रिझल्ट देणारे नोकरशहा हवे असतात. नवख्या राजकारण्यांना त्याची चाल समजून येत नाही. बऱ्याच वेळा मनोधैर्य खच्ची व्हायला नको म्हणून राजकारणी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते सरकारलाच गोत्यात आणतात. त्यातून सचिन वाझे, भूषण उपाध्याय निर्माण होतात.

महाराष्ट्रात सात लाखापेक्षा जास्त लोक असताना सरकारला एका सचिन वाझेंची गरज का भासावी? ते एवढे शिरजोर का बनावे? कारण प्रशासनात सगळ्या लोकांचा वापर कसा करायचा याची शास्त्र शुद्ध व्यवस्था नाही.मुळात पोलिस व्यवस्था कालबाह्य आहे. मला फार काही समजतं असा माझा दावा नाही. पण इतर दुसरा पर्याय मिळेपर्यंत मी केलेल्या शिफारशी विचारात घ्या, असे मी प्रत्येक सरकारला विनंती करत असतो. तशी महाविकास आघाडी सरकारलाही केलीये.

बहुंतांश मीडिया,जनता, विरोधी पक्ष,विचारवंत, साहित्यिक अशा प्रश्नांची उत्तरे व्यक्तींमध्ये शोधतात. मग सचिन वझे, परमबिरसिंग, देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे या नावांचा उच्चार होतो. वेळोवेळी नाव बदलतात. व्यवस्था तीच रहाते. महाराष्ट्राच्या या अवस्थेस कोण जबाबदार? कोण दोषी? माणसामध्ये १० टक्के दोष तर ९० टक्के इथली व्यवस्था जबाबदार /दोषीआहे ! त्याचा परिपाक म्हणून "चेहरे नको व्यवस्था बदलुया ......अठरा पगड मावळे शिवशाही मॉडेल"(२०२०) हे पुस्तक मी प्रकाशित केले आहे. सचिन वाझेंसारख्यांच्या निर्मितीची मुळे या  व्यवस्थेत दिसतात. या सरकारलाही मी या शिफारशी पाठविल्यात!
 मी माझं काम करतो. कुणी वंदा या निंदा. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com