धवलसिंहांचा प्रवेश काँग्रेसला ग्रामीण भागात उठाव देणार? - Challege before Solapur Congress to capture Rural Voters | Politics Marathi News - Sarkarnama

धवलसिंहांचा प्रवेश काँग्रेसला ग्रामीण भागात उठाव देणार?

अरविंद मोटे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

एकेकाळी 'हात' चिन्ह मतपत्रिकेत नाही म्हणून परत येणारे शेकडो मतदार ग्रामीण भागात होते. आज ग्रामीण भागात कॉंगेसची संघटनाच नाही. सध्या ग्रामीण भागात जे मतदान मिळते ते आघाडीच्या धर्माने मित्रपक्षच्या मदतीने जे मिळेल तेवढेच. स्वत:चा असा एके काळी असलेला मतदार आज कुठे गायब झाला याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

हाराष्ट्र प्रदेशाच्या कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांची निवड आणि धवलसिंह मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश अशा जमेच्या बाजू असतानाही ग्रामीण भागात कॉंग्रस पक्षाचा विस्तार मात्र, अत्यल्प आहे. ग्रामीण भागातील प्रश्‍नाला भिडणारे नेतृत्व, पंचायती समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ व साखर कारखाने अशी महात्वाची क्षेत्रे कॉंग्रेसत्तर नेत्यांनी काबिज केलेली आहेत. दुसरीकडे पक्ष नेतृत्व, संघटनावाढी प्रयत्न शहरातच होत असल्याने तसेच सातत्याने केवळ शहरी प्रश्‍नावर राजकारण केंद्रीत होत असल्याने ग्रामीण भागात कॉंग्रेसचा विस्तार होणार कसा असा प्रश्‍न तयार झाला आहे

एकेकाळी 'हात' चिन्ह मतपत्रिकेत नाही म्हणून परत येणारे शेकडो मतदार ग्रामीण भागात होते. आज ग्रामीण भागात कॉंगेसची संघटनाच नाही. सध्या ग्रामीण भागात जे मतदान मिळते ते आघाडीच्या धर्माने मित्रपक्षच्या मदतीने जे मिळेल तेवढेच. स्वत:चा असा एके काळी असलेला मतदार आज कुठे गायब झाला याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. सध्या मंत्रीपदाच्या बदल्यात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदाचा बहुमान सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मिळाला आहे. दुसरीकडे मातब्बर घराणे म्हणुन अनेक पिढ्यांचा वारसा लाभलेले धवलसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेश झालेला आहे. ग्रामणी चेहऱ्याचे जिल्ह्याला लाभलेले नेतृत्त्व व आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालेली संधी याचा लाभ जिल्ह्यातील पक्ष विस्तारास झालातर नक्कीच कॉंग्रेसला गतवैभव लाभेल. 

मात्र, ग्रामीण राजकरणाची दारे पंचायत समिती, दुध संघ, साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या राजकरणाशी निगडीत आहेत. याच्या चाव्या कॉंग्रेसच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रसने कायम आपल्या हाती ठेवल्या आहेत. यामुळे कॉंग्रेसच्या पक्ष विस्ताराला अखंड खिळ बसलेली आहे.

सध्या प्रदेश कार्यकारणीत फेरबदल झाले आहेत. याच धर्तीवर जिल्हा कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीत खांदे पालट झाला तरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्य विस्ताराची काही तरी संधी पक्षाला मिळेल व शहराच्या वेशीवर अडकलेला पक्ष जिल्ह्यात विस्तारेल अशी आशा आहे.

शेती आणि मातीशी नाळ जोडणे आवश्‍यक 
कॉंग्रेस शहरापुरताच अशी टिपण्णी कोणी केली तरी कधी कॉंग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागत नाही. विरोधात असो की सत्तेत कधी कुठलेही प्रश्‍न हाताळताना ग्रामीण भागातील प्रश्‍नाला कॉंग्रेसकडून हात लागायचला नाही. आपण भलं आणि आपला मतदार व मतदारसंघ भला या वृत्तीने केवळ शहरी प्रश्‍नच हाताळल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्ष विस्ताराला मर्यादा पडल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख