वडील वारले त्या रुग्णालयातच भाजपच्या ताजणेंनी का केली तोडफोड?

महापालिकेच्या बिटको रुग्णालयात शनिवारी सायंकाळी भाजपच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी कार घुसवून तोडफोड केली. प्रश्न सोडवण्याचा हा मार्ग नाहीच.
Tajne Bytco
Tajne Bytco

नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात शनिवारी सायंकाळी भाजपच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे (BJP Leader Rajendra Tajne Attacks on NMC Covid center) यांनी कार घुसवून तोडफोड केली. प्रश्न सोडवण्याचा हा मार्ग नाहीच. (Voilence will never a way to solve any Issue) मात्र सत्ताधारी भाजपच्या नेत्याचाच हा असंतोष (This is BJP leader inconfidence) आहे. त्याकडे केवळ तोडफोड न पाहता प्रश्न व दुःखाच्या मुळाशी जावे लागेल. अन्यथा ती भळभळणाऱ्या जखमेवर वरवरची मलमपट्टी ठरेल.

भाजप नेते राजेंद्र ताजणे यांनी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आपली इनोव्हा कार घालून तोडफोड केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास ते दृष्य एखाद्या दाक्षिणात्य सिनेमातील वाटत होते. हे फुटेज पाहताना त्यात नागरिकांचा एक आवाज कॅच झाला आहे. रुग्णाशी संबंधीत ती व्यक्त म्हणते, `बरोबर आहे ना, इथे काहीच सुविधा मिळत नाहीत हो!` आता एक श्री. ताजणे यांच्या समर्थकांनी त्यांचे समर्थन करीत `आय सपोर्ट कन्नू नाना` हा हॅशटॅग सुरु केला आहे.

हे सर्व पाहिले तरी, श्री. ताजमे यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. ही व्यवस्था सुधारण्यासाठी नागिरकांनी त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यांच्या पक्षाकडे सर्व सूत्रे आहेत. मग असुविधा असतील तर त्या सुधारण्याचे काम करणार कोण?. कारण हिंसा हा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. त्याने प्रश्न सुटत नाही, चिघळतो. त्यामुळे ही असले समर्थन काही उपयोगाचे नाही.   

याच रुग्णालयात गेल्या आठवड्यात श्री. ताजणे यांच्या वडीलांवर उपचार झाले होते. त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे श्री ताजणे उद्वीग्न झाले असावे. मात्र या प्रश्नाकडे केवळ सत्ताधारी भाजपच्या नेत्याने केलेली तोडफोड म्हणून पाहिले, तर तो देखील अन्यायच होईल. वरवरची मलमपट्टी इथे चालणार नाही. कारण महापालिकेच्या बिटको रुग्णालयाची समस्या गॅंगरीन झाली आहे. त्याची खोलवर शश्त्रक्रीयाच करावी लागेल.

या रुग्णालयाची मूळ क्षमता तीनशे खाटांची आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यावर त्याचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये झाले. येथे तीनशे रुग्णांसाठी अवघे सदतीस कर्मचारी आहे. एकाएकी तीथे चारशे नव्या खाटा आल्या व ते रुग्णालय सातशे खाटांचे झाले. खाटा, रुग्ण वाढले, मात्र सुविधा, उपचार, औषधोपचाराची साधने. औषधे व मुख्य म्हणजे कर्मचारी वाढले का?. याबाबत जवळपास सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, नगरसेवकांनी तक्रारी केल्या. लिखीत स्वरुपात निवेदन दिले. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, दोन वेळा आयुक्त, अनेकदा महापौरांनी येथे भेट दिली. एकदा तर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एका महिलेने या प्रश्नावर धारेवर धऱले. त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. माजी मुख्यमंत्र्यांविषयी व्हीडीओ व्हायरल केल्याने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला प्रकार देखील याच रुग्णालयातील. या नेत्यांनी शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुचवून सूचना केल्या होत्या. प्रशासनाने त्यावर उपाययोजना केल्या का? लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा केला का?. याचे उत्तर नाही असेच आहे.  त्यामुळे खदखद तर होती. काल तीने उग्र रुप धारण केले. 

सध्या कोरोना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांत स्पर्धा लागली आहे. तीथे साध्या पिरचारीकेला वीस ते पंचवीस तर आर्युवेद, होमिओपथीच्या डॅाक्टरचा चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये वेतन मिळते. महापालिकेने वैद्यकीय कर्मचारी भरतीची जाहिरात दिली. त्यात तत्पुरते ही अट टाकली. कर्मचाऱ्यांना वेतन बारा हजार रुपये. काम संपताच नोकरीतून कमी केले जाईल ही अट न विसरता टाकली. त्यात कारण दिले महापालिकेवर आर्थिक बोजा पडेल. आज स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील चाळीस टक्के रस्ते खोदलेले आहेत. कोट्यावधींच्या या निवादा आहेत. मग प्रश्न पडतो प्रशासन प्राधान्य कशाला देते आहे, सिंहस्थात उत्तम प्रकारे केलेल्या शेकडो रस्त्यांच्या खोदाईला की कोरोनाने घातलेल्या मृत्यूच्या थैमानाला? अशी अनेक कारणे आहेत. त्याचे निराकरण राजेंद्र ताजणे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणून निराकरण करायला हवे होते. कारण लोकशाही सत्ता व लोकप्रतिनिधींना अधिकार बहाल केले आहेत. त्याचा वापर न करता कोणी कायदा हातात घेत असेल तर मग मतदारांनी करायचे काय ?.
.... 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com