नाशिककर हेल्मेट घालणार की हवी दंडुकेशाही!

राज्य शासनासह उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनीही वेळोवेळी हेल्मेट सक्तीसंदर्भात आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी त्यासाठी हेल्मेट नसल्यास पेट्रोल पंपचालकांनी दुचाकीस्वारांना पेट्रोल देऊ नये असा आदेश काढला आहे.
Pande Helmet
Pande Helmet

.नाशिक : राज्य शासनासह उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनीही वेळोवेळी हेल्मेट सक्तीसंदर्भात  आदेश दिले आहेत. (Government as well Courts given orders regarding use of Helmet) पोलिस आयुक्तांनी त्यासाठी हेल्मेट नसल्यास पेट्रोल पंपचालकांनी दुचाकीस्वारांना पेट्रोल देऊ नये (Police commissioner instructs petrol pumps no fuel without helmet)  असा आदेश काढला आहे. त्यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच धाडसाचे आणि अभिनंदनास (This step is adnirable) पात्र आहे. ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ धोरणाची अंमलबजावणी करणारे नाशिक हे राज्यातील पहिले शहर (Nashik will be the first city implimenting this policy) ठरेल. 

या आदेशानुसार पेट्रोलपंपावर अपवादात्मक परिस्थितीत विनाहेल्मेट पेट्रोल देण्याची वेळ आल्यास दुचाकीस्वाराकडून एक फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. त्यात हेल्मेट न घालण्याचे कारण देत दुचाकीस्वाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, वाहन परवाना, वाहनाचा नोंदणी क्रमांक वगैरे माहिती नमूद करण्यात येणार आहे. पुढे या फॉर्मची खातरजमा पोलिस करतील, ते योग्य न वाटल्यास वाहन परवाना रद्द होण्याची वेळ वाहनधारकांवर येऊ शकते. 

हा आदेश काढताना पाच वर्षांत हेल्मेट न घातलेल्या ३९४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. मुळात हेल्मेटची सक्ती करण्याची वेळ का यावी, यावर विचारमंथन व्हावे. आपल्याकडे जोवर हुकुमशाही पद्धतीने कोणी काही लादत नाही, तोवर काहीच न ऐकण्याची सर्वसामान्यांची मानसिकता असते. कदाचित हे जाणून पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेण्याचे धाडस केले आहे. निर्णय किती काळ टिकेल, त्याचे काय परिणाम समोर येतील, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे, यात काही शंका नाही. मात्र, हेल्मेटबाबतचे काही गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने लोकप्रबोधन व्हायला हवे. मुंबईत शंभर टक्के हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होते. पुण्यात ८० टक्के दुचाकीस्वार हेल्मेट घालतात, नाशिकमध्ये ही आकडेवारी ३० टक्क्यांच्याही पुढे जात नाही. राज्यातील अन्य शहरांत तर नाशिकपेक्षा वाईट परिस्थिती आहे. हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे, ही गोष्ट समजण्यासाठी एवढी वर्षे का लागावी, हा प्रश्‍नच आहे. २००३ पासून हेल्मेट सक्तीसाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहे. 

पोलिसांवर एवढा दबाव निर्माण करण्याची गरज का निर्माण होते, याचा विचार नागरिकांनी करायला हवा. दुसऱ्या बाजूला पोलिसांचा धाक जरूर असावा, पण पेट्रोल बंद करणे त्यासाठी किती सयुक्तिक ठरेल, हा मुद्दा नक्कीच वादाचा होऊ शकतो. पोलिसी खाक्याचा वापर नागरिकांच्या भल्यासाठी करणाऱ्या दीपक पांडे यांचे अभिनंदन करत ही मोहीम किती दिवस पुढे सुरू राहील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल...  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com