व्वा माणिकराव, असा साधेपणा नाशिककरांनी पाहिला नव्हता!

शहरात काल एक `साधा नोंदणी ` विवाह झाला. तो एव्हढा साधा होता की, असा साधेपणा शाही विवाह देखील फिका वाटेल. हे सांगण्याचे कारण म्हणजे अवघ्या चार दिवसांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या लेटरहेडवर साधेपणा व सामाजिक दृष्टीकोणयाविषयी एक लांबलचक प्रवचन सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळेच ही चर्चा...
Kokate 001
Kokate 001

नाशिक : शहरात काल एक `साधा नोंदणी ` विवाह झाला. (simple register marrige) तो एव्हढा साधा होता की, असा साधेपणा शाही विवाह (but the marrige was planned & lavish event) देखील फिका वाटेल. हे सांगण्याचे कारण म्हणजे अवघ्या चार दिवसांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आपल्या लेटरहेडवर साधेपणा व सामाजिक दृष्टीकोण याविषयी एक लांबलचक प्रवचन सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळेच ही चर्चा...

आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी व बांधकाम व्यवसायिक राजेंद्र वानखेडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ वानखेडे यांचा विवाह गुरुवारी झाला. या विवाहाला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री छगन भुजबळ यांसह विविध मंत्र्यांनी हजेरी लावली. तुम्ही म्हणाल, आमदाराच्या घरचे लग्न मग नेते तर येणारच. बरोब्बर मात्र चर्चेचे कारण वेगळेच आहे. 

सिन्नर मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधीत्व करणारे आमदार कोकाटे यांनी आपल्या लेटरहेडवर लांबलचक सामाजिक उपदेशाचे पुराण मांडत `माझा मतदारसंघ हेच माझे कुटुंब आहे. खरे तर मला १५१ गरीब मुलींच्या सामुदायिक विवाहात मुलीचा विवाह करायचा विचार होता. कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. माझ्या कन्येचा साधा व नोंदणी पद्धतीने विवाह करीत आहे.` असे त्यांनी म्हटले होते. 

हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे अनेकांना त्याचे अप्रुप व आमदार कोकाटे यांचा अभिमान देखील वाटला. वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या झाल्या. मात्र प्रत्यक्षात विवाह झाला तेव्हा `हेच का ते माणिकराव कोकाटे` असा प्रश्न अनेकांना पडला. लग्न एव्हढे साधे होते की, एका रिसॅार्टवर कडक बंदोबस्तात ते झाले. एक वेलप्लॅन इव्हेंट होता. लग्नाआधी एक दिवस साखरपुडा, हळद या पारंपारीकतेसह अलीकडे चित्रपटांतून दिसणारा संगीत- नृत्याचा कार्यक्रम देखील झाला. मेजवाणी व मेजवाणीआधी विशेष `पेय` होतेच. दुसऱ्या दिवशी वैदीक पद्धतीने विवाह. रोषणाई, सजावट असा हा थीम मॅरेजचा  `साधा`विवाह होता. कदाचीत नाशिककरांना तो `डोळे दिपवणारा` असेल, मात्र माणिकरावांच्या दृष्टीने `साधा` असावा. 

आमदारच ते त्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले, तरी कोण विचारणार?. कारण नियम, कायदे हे तर सामान्यांसाठी असतात. आमदार म्हणजे नियमाला अपवाद.  

विवाह हा प्रत्येकाचा कौटुंबिक आनंदाचा विषय आहे. तो चर्चेचा विषय होऊ शकत नाही. मात्र याची चर्चा झाली, कारण तो एका आमदाराच्या कन्येचा विवाह होता. त्याला सार्वजनिक स्वरूप स्वतः आमदारांनीच दिले. त्यामुळे तो बातमीचा विषय झाला. `सरकारनामा`ला ही बातमी प्रसिद्ध झाली. त्यावर अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. कौतुक केले. बीडच्या एक माजी मंत्र्यांने तर याचे प्रत्येकाने अनुकरण केले पाहिजे असे म्हटले. लेटरहेडवर लिहिलेले पत्र सोशल मीडियावर टाकले नसते तर कोणी चर्चाही केली नसती. कोरोनाने अनेक सामाजिक सुधारणांना चालना दिली आहे. त्यात मर्यादीत उपस्थितीत विवाह ही एक सुधारणा आहे. समाजधुरीनांना ते वास्तवात आनण्यासाठी आयुष्य खर्ची करावे लागले. 

माणिकराव कोकाटे आमदार आहेत. तीन लाख नागरिकांचे प्रतिनिधी आहेत. सामाजिक सुधारणांना चालना देणे त्यांचे कर्तव्य आहे. कारण अनेक लोक त्यांचे अनुकरण करतात. श्री. कोकाटे यांना कोरोनाच्या निमित्ताने आलेली संधी त्यांनी वाया घालवली. कदाचीत ती संधी पुन्हा मिळेल की नाही हे काळच ठरवेल.    

लेटरहेडवर लिखीत शब्द ते अवघ्या चारच दिवसांत ते विसरले. एव्हढेच काय, या गोष्टीचा बचाव करताना त्यांनी दुसरी चुक केली. ते म्हणाले, `मला जे वाटते, ते माझ्या कुटुंबाला मान्य होईलच असे नाही. माझे व्याही वानखेडे यांनी हा वैदीक विवाहाचा समारंभ केला.` आपण अजाणतेपणी काय बोलतो याचेही भान अनेकदा रहात नाही, हे अगदी तसेच आहे. कारण `चेरीटी बिगन अॅट होम` असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीची सुरवात स्वतःपासून, कुटुंबापासून होते. जर या आमदारांचे कुटुंबच त्यांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करीत असेल, नवरदेवाचे वडील त्यांच्या व्याहाचे जे आमदार आहेत, त्यांच्या आवाहानाला दाद देत नसतील, तर इतरांनी काय करावे?, काय बोलावे?. मतदारसंघातील नागरिकांनी कसे वागावे?. 

खंत  म्हणजे, त्याच दिवशी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. त्यात पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, बहुजन समाजाचा मार्ग मनुवादापासून दूर नेणारा, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांच्या सुधारणांचा, साधेपणाचा मार्ग आहे. योगायोग म्हणजे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आमदार कोकाटे यांनी ते शब्द खोटे ठरवले.
...        

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com