रक्षा खडसेंचा गौप्यस्फोट... एकनाथ खडसेंना भाजप सोडायचा नव्हता पण...

लोकशाही मानणाऱ्या भारतीय राजकीय व्यवस्थेत एकाच कुटुंबात दोन वेगवेगळ्या विचारधारा व त्याअनुषंगाने पक्षात कार्यरत नेत्यांची उदाहरणे कमी नाहीत. जळगावातही सध्या ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत व त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे भाजपत, असे चित्र दिसते.
Khadase
Khadase

जळगाव : लोकशाही मानणाऱ्या भारतीय राजकीय व्यवस्थेत एकाच कुटुंबात दोन वेगवेगळ्या विचारधारा (There are two diffrent ideology followers in one family) व त्याअनुषंगाने पक्षात कार्यरत नेत्यांची उदाहरणे कमी नाहीत. (there are lots of such examples) जळगावातही सध्या ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत व त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे भाजपत, (In Jalgaon Eknath Khadse of NCP & daughter in law Raksha in BJP) असे चित्र दिसते. 

दोघेही तांत्रिकदृष्ट्य़ा वेगवेगळ्या पक्षात असले तरी खडसे राष्ट्रवादीत व त्यांच्या राजकीय संस्कारातून घडलेल्या रक्षाताई भाजपत निष्ठेने सेवा करताहेत. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती, भिन्न विचारधारांचे पक्ष.. तरीही अंतिमत एकाच ‘जनसेवे’च्या मार्गावरून वाटचाल करताय. 

गेल्या साडेतीन- चार दशकांपासून जळगाव जिल्ह्याच्या व पर्यायाने खानदेशाच्या राजकीय पटलावर अधिराज्य गाजविणारे नेते म्हणून एकनाथराव खडसेंचा उल्लेख होतो. ग्रामीण भागातील एका लहानशा गावातून सामान्य कार्यकर्ता म्हणून खडसेंची कारकीर्द सुरू होऊन ती पक्षाचा जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशी संघटनात्मक वाटचाल आणि त्या जोडीला आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता आणि नंतर बारा खात्यांचे मुख्यमंत्र्यांच्या समतोल प्रमुख मंत्रिपद.. हा थक्क करणारा प्रवास, या प्रवासातील टप्पे, प्रत्येक टप्प्यावरचा संघर्ष या सर्व बाबी खडसेंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उघड करतात. 

२०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाचे ‘मटेरियल’ असलेल्या खडसेंचा भाजपची राज्यात सत्ता आणण्यात मोठा वाटा होता. त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नसले तरी त्या तोडीची सर्व खाती त्यांच्याकडे महसूलमंत्री म्हणून होती आणि त्यांनी प्रत्येक खात्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे, कसोशीने प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर कथित आरोप झाले व त्यातून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतरच्या कालखंडातील त्यांचा अडचणीचा काळ सर्वांसमोर आहेच. पक्षातील काही व्यक्तींनी अन्याय केल्याचा दावा करत त्यांनी गेल्या ऑक्टोबर २०२०मध्ये पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

पक्ष सोडायचा नव्हता.. 
खरेतर, त्यांच्या बोलण्यातून नेहमी ‘जे घर मी वीट अन्‌ वीट लावून बांधले ते कसे सोडू’ असा उल्लेख सारखा यायचा. त्यांना भाजप सोडायचा नव्हता. मात्र, पक्ष सोडावा लागेल, अशी स्थिती त्यांच्यासमोर निर्माण करण्यात आल्याचे ते म्हणतात. त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली असली तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आज भाजपत कार्यरत आहे. नाथाभाऊंना मानतो, त्यांचे समर्थक आहोत म्हणून या भाजप कार्यकर्त्यांनी कधी राष्ट्रवादीशी जवळीक केली नाही, हेदेखील तेवढेच खरे. कारण, ज्या पक्षात आपण आहोत, त्या पक्षाचे काम निष्ठेने करायचे, ही नाथाभाऊंची शिकवण असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. 

रक्षाताईंची वाटचाल त्याच दिशेने 
खरेतर खडसेंच्या राजकीय संस्कारात रक्षा खडसे तयार झाल्यात. सुरुवातीला कोथळीच्या सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, सभापती आणि २०१४ च्या निवडणुकीत थेट रावेर लोकसभेच्या खासदार म्हणून रक्षाताईंच्या गळ्यात विजयी माळा पडली. एकनाथरावांप्रमाणेच रक्षाताईंची वाटचालही संघर्षाने भरलेली. परंतु, या वाटचालीत त्या डगमगल्या नाहीत, वारसदार म्हणून त्यांच्या नावापुढे खडसे आडनाव लागले खरे. मात्र, त्यांनी जिल्हा परिषदेत सभापती व आता साडेसात वर्षांपासून खासदार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षाताईंनी त्यांची भाजपतच राहण्याची भूमिका अनेकदा बोलून दाखवली आहे. वैचारिकदृष्ट्य़ा श्वसुर- स्नुषा यांनी वेगळा मार्ग चोखाळला असला तरी त्यांच्या राजकीय भूमिका जनसेवा अथवा विकासाच्या ध्येयापर्यंत पोचण्यात एकमेकांना अजिबात अडथळा ठरत नाहीत, असे चित्र अधोरेखित होते. 

..
नाथाभाऊ राष्ट्रवादीत असले तरी तीस- चाळीस वर्षे त्यांनी भाजपत निष्ठेने सेवा केली. भाजपत हजारो कार्यकर्ते त्यांना मानतात. त्यांच्याच संस्कारातून आम्ही तयार झालो. त्यांनी कधीही मी कोणत्या पक्षात राहावे, जावे याबाबत आग्रह धरला नाही. ज्या पक्षात आहे तिथे निष्ठेने काम कर, हा त्यांचा संस्कार. त्या संस्कारातूनच मी भाजपत कार्यरत आहे व राहील. - रक्षा खडसे 

...
कोणताही पक्ष वाईट कधी नसतो. त्यातील काही व्यक्ती, प्रवृत्ती वाईट असतात. या प्रवृत्तींचा त्रास झाला म्हणूनच भाजप सोडण्याची वेळ माझ्यावर आली. राष्ट्रवादीत त्यावेळी पवार साहेबांनी समर्थ साथ दिली. ज्या पक्षात आपण राहू, त्या पक्षाचीच सेवा आणि जनतेची कामे तळमळीने करीत राहू. - एकनाथराव खडसे  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com