हा भक्त म्हणतो, `पेट्रोल दरवाढ ही तर राष्ट्रभक्तीची संधी!`

पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून विरोध केलाच पाहिजे का? अहो, यातून सरकारला कर मिळतो. त्यामुळे यानिमित्ताने सरकार आपल्याला राष्ट्रभक्ती व्यक्त करण्याची संधी देते, त्यावर आंदोलन काय करता?, असे विधान जर कोणी करीत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणाल?... अहो, काही म्हणू नका, त्याला `भक्त` म्हणा अन् दाद द्या.
Bhakt
Bhakt

नाशिक : पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून विरोध केलाच पाहिजे का? अहो, (We shouldnot oppose Price hike of Fuel all the time) यातून सरकारला कर मिळतो. त्यामुळे यानिमित्ताने सरकार आपल्याला राष्ट्रभक्ती व्यक्त करण्याची संधी देते, (This is opportunity of patriotism for citizen) त्यावर आंदोलन काय करता?, असे विधान जर कोणी करीत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणाल?... अहो, काही म्हणू नका, त्याला `भक्त` म्हणा अन् दाद द्या.

अनेकांना हे विधान अतिश्योक्तीचे वाटेल, मात्र हे सत्य आहे. येथील एका उच्च विद्याविभूषित व्यक्ती सातत्याने या आशयाच्या पोस्ट व्हायरल करीत असल्याने ही दुर्मिळ व्यक्ती चर्चेचा विषय ठरली. वाणिज्य शाखेचे पदवीधर आणि व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या या व्यक्तीला, `तुमच्यासारखे विचार किंवा कल्पना असलेले किती लोक शहरात असतील, `असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, `फार थोडे असतील. हवं तर तुम्ही मला भक्त म्हणा`

त्यांच्या बहुतांश पोस्ट अशाच असतात. आज सकाळी त्यांची पोस्ट होती. `आजकाल सरकारच्या कोणत्याही गोष्टींवर टीका करायची सवय झाली आहे. गावातले होंडाचे शोरूम माहिती नसेल, पण हा राफेलवर टीका करेल?. अती लोकशाही`, ` पेट्रोल, गॅस यांच्या किमतीविरोधी आंदोलन हे हास्यास्पद आहे. दोन्ही बाबी आंतरराष्ट्रीय किमतीशी निगडित आहेत. त्याला सरकार काय करणार?` या आशयाच्या त्यांच्या पोस्टमुळे वाद-विवाद ठरलेलेच असतात. यावर नागरिकांनी प्रतिक्रिया टाकली, `मग हे इंधन दरवाढीवर आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना का नाही सांगितले`   

फेसबूकवर अत्यंत सक्रिय असलेल्या या व्यक्तीने टाकलेल्या पोस्ट वाचल्या, तर त्याची चर्चा होते. त्यावर नागरिकांकडून त्यांना भरपूर टीका व राग व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियादेखील येतात. मात्र त्यांच्यावर त्याचा काहीही फरक होत नाही. ते म्हणाले, अहो काँग्रेसचे सरकार असताना काही गोष्टी त्यांच्या हातात होत्या. त्यामुळे ते दर नियंत्रित ठेवू शकत होते. आत्ता सरकारला हे काही करता येत नाही. कारण ते त्यांच्या हातातच नाही. अहो, इंधनावरील करातून केंद्र सरकारला साडेपाच लाख कोटींचा कर मिळाला. हा कराचा पैसा पुन्हा जनतेकडेच येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने आपल्याला राष्ट्रभक्ती करण्याची संधीच नव्हे का?.

अहो, दरवाढ होऊ नये, हे खर. पण मग जेव्हा कांद्याचे भाव वाढतात, तेव्हा एखादे सरकार कोसळू शकते. हे माहीत असलेले सरकार पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस याची भरमसाठ दरवाढ होत असताना गप्प बसेल काय. त्यांना हे कळत नाही का?. त्यांच्या या प्रतिक्रियेवर काही निरुत्तर होतात, मात्र बुहतांश त्यांच्यावर लाखोली वाहतात. त्यामुळे सोशल मीडियावरील या भक्तांच्या पोस्ट हा चर्चेचा, विनोदाचा आणि त्याचबरोबर राजकीय बचावाची भूमिका काय असू शकते याची प्रचिती देऊन जाते.

व्यवहार व सरकार यांचा अत्यंत निकटचा संबंध असतो. घरातील व दैनंदिन व्यवहार जेव्हा हाताबाहेर जातात. पगारात काही भागत नाही. गृहिनीचे महिन्याचे बजेट कोलमडते, तेव्हा अगदी नेत्यांच्या बायकाही नाखूष होतातच. भाजीपाला, जीवनावश्य वस्तूंचे दर गगनाला भिडले त्याला इंधन दरवाढ हे कारण आहे. शेजारच्या राष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर त्यांनी सर्व प्रथम इंधनाचे व शेतीच्या उपयोगी साहित्याचे दर घटवले. लोकांच्या हातात पैसा कसा जाईल, याची व्यवस्था केली. इकडे मात्र महागाई वाढते. हा विरोधाभास म्हणजे भक्तांच्या दृष्टीने राष्ट्रप्रेम आहे. असा विचार असलेले लोक दुर्मिळ आहेत, मात्र आपल्या आजुबाजूला आहेत. असा देखील विचार असू शकतो, ते चुकीचे असले तरी मान्य करावेच लागेल ना!.

हा भक्त नाशिकचा. त्याच्यासारखे आनखी काही आहेत. मात्र त्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात व देशात कमतरता नाही. त्यांच्या या भूमिकेवर पुन्हा चुलीकडे वळालेल्या ग्रामीण भागातील भगीनी निश्चित नाराज होतील. मात्र स्वयंपाकाच्या गॅसमुळे धुरापासून सुटका झालेल्या त्यांच्या घरातील महिला त्यांच्याविषयी काय बोलत असतील?. हे विचारल्यावर ते म्हणाले, `त्यांनाकुठे काय देशप्रेम आणि व्यावहार कळतो. ही जबाबदारी तर आपल्यावर आहे ना?` या प्रतिक्रीयेनंतर संवाद थांबवलेलाच बरा, याची जाणीव झाली. त्यामुळे बातमीत एव्हढेच.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com