महाआघाडी सरकारला वाचाळ नेत्यांची डोकेदुखी!

...
uddahv thackray
uddahv thackray

मुंबई : रोज नवनवीन वादग्रस्त विधान करणा-या वाचाळविर नेत्यांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या स्थैर्यांवर याचा काहीच परिणाम होत नसला तरी विरोधी पक्ष असलेल्या भाजपला या वाचाळ नेत्यांमुळे आयतेच कोलीत मिळत आहे.

राज्यात अनेक नाटयमय घडामोडीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे हे सरकार किती दिवस चालणार? असा प्रश्‍न विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या दोन पक्षांनी यापुर्वी आघाडी करून पंधरा वर्षे राज्यकार केला आहे मात्र शिवसेना या पक्षाल सोबत घेउन प्रथमच हे तीन पक्ष सत्तेत सहभागी झाल्यामुळे राज्यकारभार किमान समान कार्यक्रम नजरेसमोर ठेवून सध्या सुरू आहे. असे असले तरीही या तीन पक्षांतील चाचाळ नेत्यांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

कॉंग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि विदयमान सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर अविश्‍वास व्यक्‍त करणा-या आशयाचे विधान केल्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.

चव्हाण म्हणाले की सरकार संविधानानुसार चालणार असल्याचे आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतले आहे. चव्हाण यांच्या या विधानामुळे शिवसेनेची चांगली पंचाईत झाली. चव्हाण यांनी अशा स्वरूपाचे विधान करण्यापूर्वी काही दिवस अगोदर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या तथाकथित भेटीविषयी टिप्पणी केली होती. यामुळे कॉंग्रेस पक्षात वादंग उठले होते. कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला होता. त्यामुळे राऊत यांना त्यांचे विधान मागे घ्यावे लागले होते तरीही या दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com