tomorrow mumbai band maratha kranti morcha | Sarkarnama

उद्या मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यात बंद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबई : राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर उद्या मंगळवार (ता.25) ला मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची आज बैठक झाली. 

या बैठकीत सरकारच्या मराठा विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे या युवकाला श्रद्धांजली अर्पण करून उद्या मुंबई बंदची हाक देण्यात आली. हा बंद शांततेत पार पाडतानाच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी दक्षता घेण्याचे आवाहनदेखील समन्वयकांनी केले. 

दरम्यान, नवी मुंबई, रायगड व पालघर जिल्ह्यातही बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे, उद्या मुंबईकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यास मुंबईच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची भीती आहे. आज राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटले आहेत. या आंदोलनकर्त्यांना समर्थन म्हणून चेंबूर येथे सकाळी मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. मात्र, काही तासांत या महिलांची समजूत काढत पोलिस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली. 

उद्याच्या बंद मधून शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांना सूट देण्यात आली असून, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्कूल बसला रोखू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, खबरदारी म्हणून राज्य सरकारने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय उद्‌या सकाळची स्थिती पाहून घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख