tomorrow ganesh naik, harshwardh krupasingh in bjp | Sarkarnama

गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर हातात कमळ घेणार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये होणारे इनकमिंग जोरात असून उद्या मुंबईत मोठे पाच नेते भाजपत प्रवेश करणार आहेत. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कॉंग्रेस नेते आणि मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, शिराळ्याचे सत्यजित देशमुख दुपारी तीन वाजता गरवारे क्‍लब मुंबई येथे या हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

तसेच राष्ट्रवादीचे दुसरे एक नेते गणेश नाईक आणि साताऱ्यातील कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हे ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच भाजपची ही तिसरी मेगा भरती आहे असे म्हणावे लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत. 

चक्क भाजपमधून आऊटगोईंगकॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात असून कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या मातब्बर नेत्यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने आघाडीसाठी ही चिंतेची बाब आहे.

सातत्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपत होणारे आऊटगोईंग सध्या तरी आघाडीला थांबविण्यात अपयश आल्याचेच यातून दिसून येत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख