आजचा वाढदिवस : श्रीनिवास पाटील - खासदार, सातारा.  - todays birthday shrinivas patil mp - satara | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : श्रीनिवास पाटील - खासदार, सातारा. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सनदी अधिकारी ते खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि पुन्हा साताऱ्याचे खासदार पदापर्यंत त्यांच्या कार्याची वाटचाल आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील हे उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, वर्धा, नगर जिल्ह्यात प्रांताधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर 1979 ला त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाली.

सनदी अधिकारी ते खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि पुन्हा साताऱ्याचे खासदार पदापर्यंत त्यांच्या कार्याची वाटचाल आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील हे उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, वर्धा, नगर जिल्ह्यात प्रांताधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर 1979 ला त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांनी बीड, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी महापालिकेचे आयुक्त, नागपूर चे उपआयुक्त, आदिवासी विकास नाशिकचे उपआयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासाचे अध्यक्ष अशा पदांवर काम केले. 

1999 मध्ये त्यांनी प्रसाशकिय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते युवक कॉंग्रेसचे क्रियाशील सदस्य झाले. त्याच दरम्यान ते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पहिल्याच वर्षी ते कराडचे खासदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर दुसऱ्यांदा कराडचे खासदार झाले. त्यावेळी त्यांनी सर्वाधिक मते घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी च्या नियोजन व विकासचे  उपाध्यक्ष होते. 2013 मध्ये ते सिक्कीमचे राज्यपाल झाले. ते 2018 पर्यत त्यांनी या पदावर काम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा सामाजिक व राजकीय क्षेत्रात कामास सुरवात केली. याच दरम्यान, 2019 मध्ये त्यांनी सातारा लोकसभेची पोट निवडणूक लढली आणि उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख