आजचा वाढदिवस : आमदार राहुल कुल - today`s birthday : Rahul Kul | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आमदार राहुल कुल

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांचा आज वाढदिवस. त्यांचे वडिल कै. सुभाष कुल आणि आई रंजना कुल हे दोघेही दौंडचे आमदार होते. आई, वडील आणि मुलगा आमदार असणारे महाराष्ट्रातील हे दुसरे घराणे. कन्नडचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांचेही आई व वडील दोघेही आमदार होते. 

कुल यांनी दौंडच्या राजकारणावर पकड मिळवली आहे. वडिलांप्रमाणेच त्यांचा तळागाळात संपर्क आहे. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी उत्तम संबंध ठेवले आहेत. तालुक्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात भर दिला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात प्रभाव दाखविणाऱअया अपेक्षित नेत्यांत त्यांचा समावेश होतो आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख