दौंडमधील राजकीय सत्तेचा केंद्रबिंदू : राहुल कुल  - today`s birthday : Rahul Kul | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

दौंडमधील राजकीय सत्तेचा केंद्रबिंदू : राहुल कुल 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पवार कुटुंबियांचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेले आमदार राहुल कुल 30 ऑक्टोबरला आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1990 पासून कुल घराणे हे दौंडमधील सत्तेचे केंद्रबिंदू राहिले आहे. 

पवार कुटुंबियांचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालेले आमदार राहुल कुल 30 ऑक्टोबरला आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1990 पासून कुल घराणे हे दौंडमधील सत्तेचे केंद्रबिंदू राहिले आहे. 

राहुल कुल यांनी राजकारणात प्रवेश करून 17 वर्षे झाली. त्यात 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता दौंडमधील मतदारांनी त्यांना नेहमी साथ दिली. दिवंगत आमदार सुभाष कुल व माजी आमदार रंजना कुल यांचे पुत्र म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांनीही जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आई वडीलांनंतर मुलगा आमदार होण्याचे राज्यात दोनच उदाहरणे आहेत. कन्नड ( जि.औरंगाबाद ) मतदार संघातील हर्षवर्धन जाधव व दौँड मधील राहुल कुल यांना ही संधी मिळाली आहे. 

सुभाष कुल यांच्या निधनानंतर राहुल कुल यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळणार होती. मात्र त्यावेळी त्यांचे वय 24 असल्याने त्यांना आमदार होता आले नाही. तेव्हा आई रंजना कुल या आमदार झाल्या. सुभाष कुल यांच्या निधनानंतर राहुल कुल व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या राजकीय संघर्षाला सुरवात झाली. राजकारणात मातब्बर समजल्या जाणाऱ्या रमेश थोरातांना आमदारकीसाठी राहुल कुल यांनी तब्बल 9 वर्षे झुंजविले. 2009 च्या निवडणुकीत राहुल हे थोरातांकडून पराभूत झाले.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कुल यांना उमेदवारी दिली. या पक्षाचे ते एकमेव आमदार तेव्हा निवडून आले होते. राहुल कुल यांनी आता वेगळी राजकीय चूल मांडली असली तरी पवार कुटुंबीयांबद्दल त्यांची नेहमी आदराची भावना राहिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख