today`s birthday : Pratibha Patil | Sarkarnama

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची देशाच्या इतिहासात नोंद झाली आहे. मूळच्या जळगावच्या असलेल्या प्रतिभा पाटील यांचा विवाह अमरावतीचे देवीसिंग शेखावत यांच्याशी झाल्यानंतरही त्यांनी राजकारणात प्रतिभा पाटील म्हणूनच ओळख कायम ठेवली.

घरातूनच कॉंग्रेस विचारसरणीचा प्रभाव असल्याने त्यांनी आयुष्यभर कॉंग्रेससोबत राजकारण केले. राज्य व केंद्राच्या राजकारणात त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. इंदिरा गांधी, राजीव गांधी व त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. आणीबाणीनंतर राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रतिभा पाटील यांची इंदिरा गांधींनी नियुक्ती केली होती. राज्याच्या राजकारणातही त्यांनी अनेक मंत्रिपदे व विरोधी पक्षनेतेपद भूषविले.

अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. 2007 मध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यूपीएने त्यांची निवड केली. त्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. त्यांची कारकिर्द अनेक उपक्रमांमुळे लक्षणीय झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख