आजचा वाढदिवस : पंकज भुजबळ - माजी आमदार - Todays birthday : Pankaj Bhujbal - ex-mla - nandhgaon (Nashik) | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : पंकज भुजबळ - माजी आमदार

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 मार्च 2020

पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे ते चिरंजीव आहेत. पंकज भुजबळ यांनी 2009
आणि 2014 असे दोनवेळा नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) संस्थेचे संचालक आहेत.

नांदगाव हा अत्यंत दुष्काळी मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानसभेवर ते दोनवेळा निवडून गेले. त्यांनी या दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील मुलभूत विकासकामे, पाण्याच्या प्रश्‍नावर काम केले. रस्ते, लघुपाटबंधारे, मनमाड शहराचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी योजना तयार करण्यात त्यांचा मोठा पाठपुरावा कामी आला होता. 

2019 मध्ये झालेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी कार्यकर्ते, लोकांशी संपर्क कायम ठेवला आहे. पक्षाच्या विविध आंदोलन, कार्यक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख