आजचा वाढदिवस : कृष्णा खोपडे, आमदार, नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघ. - Todays birthday : Krushna Khopde, mla, nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : कृष्णा खोपडे, आमदार, नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघ.

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 मार्च 2020

पूर्व नागपुरातून सलग पाच वेळा निवडून आलेले कॉंग्रेसचे बलाढ्य नेते, माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांना 1999 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करुन कृष्णा खोपडे आमदार झाले. तेव्हापासून 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी कुणालाही पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आसपास येऊ दिलेले नाही. 

2014 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे अभिजित वंजारी आणि 2019 मध्ये कॉंग्रेसचेच पुरुषोत्तम हजारे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अत्यंत गरीब परीस्थितीतून संघर्ष करुन त्यांनी येथपर्यंतचा प्रवास केला आहे. आमदार व्हायच्या आधी 10 वर्षे ते नगरसेवक होते. पैकी पाच वर्ष स्थायी समिती सभापती होते. 20 वर्षापूर्वी त्यांनी गिरनार को-ऑपरेटीव्ह सोसायटीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार मिळवून दिला. नागपुरात सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांचा लौकीक आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख