दिलीप वळसे पाटील : दूरदृष्टीचा नेता - today`s birthday : Dilip Walase Patil | Politics Marathi News - Sarkarnama

दिलीप वळसे पाटील : दूरदृष्टीचा नेता

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा आज वाढदिवस. राज्याच्या भल्यासाठी अनेक निर्णय घेणारे नेते म्हणून वळसे पाटील यांची ओळख आहे. राजकारणापलिकडे मैत्री जपणारे, पदाची उंची वाढविणारे, आंबेगाव तालुक्याच्या विकासाची मुहूर्तभेढ रोवणारे नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून वळसे पाटील यांनी गेली ३५ वर्षे काम केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वळसे यांचे नेतृत्त्व बहरले. मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला.

शिक्षणाच्या क्षेत्रात संधीची कमतरता असल्यास विद्यार्थ्याला गळेकापू स्पर्धा, पैसा, कमी जागांमुळे पात्र- अपात्रतेचा वाद, राखीव जागा- कोटा आणि त्यातून आलेले शैक्षणिक अस्वास्थ्य असे वातावरण तयार होते. दिलीप वळसे पाटील यांच्या एका निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची या धकाधकीतून सुटका झाली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असताना त्यांनी अभियांत्रिकीच्या जागा इतक्‍या वाढवून दिल्या, की ज्याला पाहिजे त्याला प्रवेश मिळाला.

असे अनेक निर्णय दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. जसे एमकेसीएलची स्थापना करून राज्यात संगणक साक्षर तरुणांची फळी त्यातून उभी राहिली. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी केलेले काम या राज्याला अंधारातून प्रकाशात नेणारे आहे. वीज मंडळाच्या तीन कंपन्या करणे आणि विजेच्या पायाभूत सुविधांची व्यापक कामे यातून त्यांनी राज्याचे ऊर्जाक्षेत्र भक्कम पायावर उभे केले आहे. लोडशेडिंगमुक्‍त्त महाराष्ट्र ही त्यांची देणगी आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी राज्यातील जिल्हा व प्रमुख रुग्णालयांना सर्वाधिक निधी दिला. गरिबांच्या सोयीसाठीही रुग्णालये त्यामुळे अत्याधुनिक बनली. हा नेता शरद पवार साहेबांबरोबर सुरवातीच्या टप्प्यात सावलीसारखा राहिला. त्यामुळे निर्णयातील बारकावे व परिणाम यांवर पवार साहेबांचा प्रभाव आहे. विषयाचा अभ्यास केल्याशिवाय ते त्याला भिडत नाहीत. विषयाचा सर्व अंगांनी विचार, भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टी, नीटनेटकेपणा आणि अथक कष्ट करण्याच्या वृत्तीला संवेदनशील मनाची जोड हे सगळे त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नेतृत्वाची वेगळी उंची त्यांनी गाठली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष असताना कठोर शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले गेले.  शरद पवार यांनी राष्ट्रीय साखर उत्पादक संघाचे अध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेचे व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्षपद सोपवून त्यांचा कामाचा परिघ राष्ट्रीय स्तराचा केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख