आजचा वाढदिवस : देविदास पिंगळे - माजी खासदार, नाशिक. - Todays Birthday : Devidas Pingle - ex-mla- nashik | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : देविदास पिंगळे - माजी खासदार, नाशिक.

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 12 मार्च 2020

माजी खासदार देविदास पिंगळे हे पक्ष अडचणीत असताना पक्षाशी एकनीष्ठ राहिलेले नेते आहेत. नाशिक बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व आहे. नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेवर वर्चस्व, राज्य सहकारी बॅंकेत संचालक, मुंबई बाजार समितीचे संचालक असे विविध पदे त्यांनी भूषविलेली आहेत. आज सत्तेपासून दुर असले तरीही ते सक्रीय आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन झाल्यावर पक्षाची अवघी दोन मते असताना देविदास पिंगळे यांनी शिवसेना व कॉंग्रेसचा पराभव करुन विधान परिषदेची निवडणूक एकहाती जिंकली होती. 2009 मध्ये ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. हा त्यांचा राजकारणातील सर्वोच्च काळ होता. 

मागील पाच वर्षात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पक्षांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. पण ते जराही विचलीत न होता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जिल्ह्यात ते लोकप्रिय नेते आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख