आजचा वाढदिवस : बाळासाहेब थोरात - महसूलमंत्री 

आजचा वाढदिवस : बाळासाहेब थोरात - महसूलमंत्री 

नगर : सात फेब्रुवारी 1953 रोजी थोरात यांचा जन्म झाला. जोर्वे (ता. संगमनेर) हे त्यांचे गाव. वडील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा असल्याने राजकारणाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. बी. ए., एलएल.बी हे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय होऊन विविध संस्थांची धुरा हाती घेतली. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना कामगारांशी, शेतकऱ्यांची कायम चांगला संपर्क ठेवता
आला. त्यानंतरच्या काळात अमृतवाहिनी सहकारी दूध उत्पादक संस्था, शासकीय दुग्धशाळा, संगमनेर तालुका सहकारी सूत गिरणी, मथुराबाई थोरात दंत महाविद्यालय अशा संस्थांची स्थापना करून ते तालुक्‍यातील प्रत्येक घरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. राज्य विडी कामगार वेतन समिती, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्थेचे फेडरेशन या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 

उस्मानाबादचे पालकमंत्रीपद भूषवून त्यांनी आपल्या कामाची चुणूक इतर जिल्ह्यातही दाखवून दिली होती. 2019 हे साल कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान कॉंग्रेसची स्थिती हलाखीची झाली. पडत्या काळात पक्षाला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. मात्र थोरात यांनी भक्कमपणे उभे राहत सोनिया गांधी, राहुल गांधी यांना साथ दिली. त्यामुळेच महाराष्ट्र
कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्या गळ्यात पडली. महाविकास आघाडीच्या सरकारात ते महसूलमंत्री आहेत.

नगर जिल्ह्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. निळवंडे धरणाचे कालवे, जिल्हा विभाजनाचा प्रश्न या महत्त्वाच्या विषयांवर ते काय संकल्प करतात या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com