आजचा वाढदिवस : अमित विलासराव देशमुख - वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र  - todays birthday : amit deshmukh - Minister of Medical Education and Cultural Affairs, Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : अमित विलासराव देशमुख - वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 मार्च 2020

अमित विलासराव देशमुख यांचा जन्म 21 मार्च 1976 रोजी बाभुळगावच्या देशमुख यांच्या राजकीय घराण्यात झाला. वडील दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडूनच अमित देशमुख यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. उच्चशिक्षण घेत असतांनाच 1997 च्या लातूर नगर परिषद निवडणुकीत अमित देशमुख यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी कॉंग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून प्रचार केला. 

त्यानंतर 1999 मध्ये लातूर लोकसभा निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रचारातही सहभाग नोंदवला होता. त्यानंतर युवक कॉंग्रेसमध्ये सक्रीय होत त्यांनी 2002 ते 2008 दरम्यान युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती. 

2009 मध्ये अमित देशमुख यांना पहिल्यांदाच थेट लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. बसपा आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल 90 हजार मतांनी पराभव करत त्यांनी दणक्‍यात विधानभवनात एन्ट्री केली. त्यानंतर 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम राखत विजय मिळवला. 

राज्यात नव्याने निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अमित देशमुख यांच्या रुपाने लातूर जिल्ह्याला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळाले. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद अमित देशमुख यांना देण्यात आले. या शिवाय लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील अमित देशमुख यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख