आजचे वाढदिवस - खासदार सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब मल्हारी कांबळे, रमेश आडसकर

आजचे वाढदिवस - खासदार सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब मल्हारी कांबळे, रमेश आडसकर
आजचे वाढदिवस - खासदार सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब मल्हारी कांबळे, रमेश आडसकर

आजचे वाढदिवस
खासदार सदाशिव लोखंडे

जन्म - एक जून 1962
लोकसभा मतदार संघ - शिर्डी
सध्या शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. ते सलग तीन वेळ आमदार होते. त्यांनी खेमानंद सहकारी दूध संस्था, दूध उत्पादक संघ, खेमानंद दूध व प्रक्रिया उद्योग लिमिटेड, महाराष्ट्र प्रगती मंडळ या संस्थांची स्थापना केली. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चाचे सचिवपद, भाजप चेंबूर विधानसभा मतदार संघाचे महामंत्रीपद, प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्षपद असे विविध पदे भूषविली. तसेच उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.
--------
भाऊसाहेब मल्हारी कांबळे
जन्म - एक जून 1955
पक्ष - काँग्रेस
मतदारसंघ - श्रीरामपूर विधानसभा
कांबळे यांनी नगरसेवक पदापासून 1985 साली राजकीय कारकीर्दीस प्रारंभ. श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, 2001 साली शिक्षण मंडळाचे सदस्य, 2009 साली प्रथम आमदार झाले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. संत रोहिदास सेवा मंडळाचे संस्थापक आहेत. त्यामाध्यमातून सामुदायिक विवाह तसेच विविध सामुदायिक उपक्रम राबवितात. त्यांच्या पत्नी मंदाताई कांबळे या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होत्या.
................
रमेश आडसकर - अंबा सहकारी कारखाना अध्यक्ष.
जन्म - 1 जून
दिवंगत आमदार बाबूराव आडसकर यांचे रमेश आडसकर हे कनिष्ठ चिरंजीव आहेत.
अंबा सहकारी साखर कारखाना आणि योगेश्‍वरी सहकारी सुतगिरणीचे अध्यक्षपद
रमेश आडसकर यांच्याकडे सध्या आहे. केज, धारुर व अंबाजोगाई या तीन
तालुक्‍यांत कार्यकर्त्यांची मजबुत फळी त्यांच्याकडे आहे. शिवाय केज,
माजलगाव या दोन विधानसभा मतदार संघाचे गणित आडसकर यांच्या भुमिकेवरुनच केज व धारुर मधील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com