आजचे वाढदिवस

आजचे वाढदिवस

आजचे वाढदिवस : 
श्री. चिंतामण वनगा 
खासदार 
जन्म : 1 जून, 1950. 
राज्यातील लोकसभेचा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे खासदार हे आदिवासी समाजातून पुढे आलेले आहेत. व्यवसायाने वकील असताना गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागातील भाजपचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी 1996 आणि 1999 या लोकसभेच्या दोन निवडणूक भाजपच्या तिकिटावर त्यांनी जिंकल्या आहेत. 2009 मध्ये विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. 
------------------ 
डॉ. शालिनीताई बोरसे 
माजी आमदार, माजी मंत्री. 
डॉ. शालिनीताई बोरसे या धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 1985 ते 1995 पर्यंत कॉंग्रेसच्या आमदार होत्या. त्यांनी 1991 ते 1993 मध्ये मंत्रिपद भूषविले. नऊ खात्यांचे मंत्रिपद डॉ. बोरसे यांनी समर्थपणे सांभाळले होते. क्रीडा, युवक कल्याण, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य यासारखी विविध खाते त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पाठपुराव्यातून झालेली धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापी योजना आजही महत्त्वाचे योगदान बजावत आहे. 
....................... 
श्री. विष्णू सवरा 
आमदार 
जन्म : 1 जून 2017 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे सालापासून भाजपमध्ये विविध पदांपर्यत कार्यरत राहिले आहेत. ते वाडा विधानसभा (अनुसूचित जमाती राखीव)या मतदारसंघात चारवेळा व भिवंडी विधानसभा ग्रामीण मतदारसंघात एकवेळा तर विक्रमगड विधानसभा मतदारसंघात एकवेळा असे सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.आजघडीला ते विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करत असून ते राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com