Todays Birtdhday - Uttam Baba Bhalerao - ex mla chandwad-devla | Sarkarnama

आजचा वाढदिवस : उत्तम बाबा भालेराव - माजी आमदार (चांदवड-देवळा)

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 मार्च 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांचा आज वाढदिवस. नागवेलीच्या पानांसाठी प्रसिध्द असलेल्या व सध्या
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या वडनेरभैरव गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना घरात राजकीय वारसा नसतानाही त्यांनी राजकारणात आपले स्थान
निर्माण केले. 

2009 मध्ये ते या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी या दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील मुलभूत विकासकामे आणि पाण्याच्या प्रश्‍नावर पाठपुरावा
केला. राज्यातील आघाडीच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ते संचालक आहेत. ते कादवा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदावर आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख