राष्ट्रवादीने नाकारल्यामुळे मी आज खासदार झालो : धैर्यशील माने

शेतकऱ्यां साठी इतके काम करेन की पुढील पाच वर्षात राजू शेट्टीं त्यांना आठवणार सुद्धा नाहीत.- धैर्यशील माने
Shetty-Mane
Shetty-Mane

कोल्हापूर  :  राष्ट्रवादीने अविश्वास दाखवला त्याचा फायदा मला झाला. खासदार शरद पवारांनी उमेदवारी नाकारल्यामुळे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये जावे लागले. आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. म्हणूनच राष्ट्रवादीने नाकारल्यामुळे मी आज खासदार झालो असेही मत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नूतन खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. 

देशातील शेतकऱ्यांचा नेता असलेल्या राजू शेट्टी यांची हॅटट्रिक माने यांनी रोखली. यापूर्वी खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांची हॅटट्रिक राजू शेट्टी यांनी रोखली होती. धैर्यशील माने यांच्या निमित्ताने त्यांनी याचे उट्टे काढले आहे . 

"मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी कधीच शेट्टी यांच्याविरोधात टीका केली नाही, आणि ते शेतकऱ्यांचे देशाचे नेते असल्यामुळे माझ्या सारख्या क्षुल्लक कार्यकर्त्यावर त्यांनी ही टीका केली नाही. त्यामुळे  पॉझिटिव पद्धतीने मी माझा प्रचार केला आणि तरुण कार्यकर्त्यांनी आपला खासदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली.
शेतकऱ्यां साठी इतके काम करेन की पुढील पाच वर्षात राजू शेट्टीं त्यांना आठवणार सुद्धा नाहीत," अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यशील माने यांनी  माध्यमांशी बोलताना दिली. 

"कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न केंद्रशासनाच्या मदतीने सोडविण्यासाठी प्राधान्य असेल. पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक जास्त फटका माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकांना बसतो.  साधारण पुढील काही दिवसात कार्यकर्ते मतदारांशी चर्चा करून विकासाच्या प्रश्नाचा अजेंडा तयार करणार आहोत. शेती व्यवसायात तरुण उतरला आहे. प्रगत शेतकरी बनविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल.टेक्सटाइल इंडस्ट्री मध्येही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये केंद्रशासनाच्या मदतीने मोठ्या पद्धतीने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे," असेही त्यांनी सांगितले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com