आजचा वाढदिवस : आमदार नमिता मुंदडा - Today's birthday: MLA Namita Mundada | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार नमिता मुंदडा

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

नमिता मुंदडा उच्चशिक्षीत असून त्या वास्तुशास्त्र विषयातील पदवीधर आणि गोल्ड मेडिलिस्ट आहेत.

बीड : बीड जिल्ह्यातील केज मतदार संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार नमिता मुंदडा या दिवंगत लोकनेत्या माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. राष्ट्रवादी काँग्रसकडून २०१४ च्या निवडणुकीत पराभव झालेल्या मुंदडा २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या.

नमिता मुंदडा उच्चशिक्षीत असून त्या वास्तुशास्त्र विषयातील पदवीधर आणि गोल्ड मेडिलिस्ट आहेत. त्यांनी याच विषयात परदेशातून पदव्युत्तर पदवीही मिळविलेली आहे. दिवंगत मुंदडा यांनी या मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करत विविध खात्यांचे मंत्रीपदही सांभाळले होते. आता त्यांच्या जागी काम करणाऱ्या नमिता मुंदडा देखील मतदार संघातील प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत आग्रही असतात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख