Today's Birthday: Mangesh Chavan (MLA, BJP, Chalisgaon) | Sarkarnama

आजचा वाढदिवस : मंगेश चव्हाण (आमदार, भाजप, चाळीसगाव)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 ऑगस्ट 2020

चाळीसगाव विधानसभा मतदार संघात कोविड पॉझीटीव्ह रूग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमध्येही रूग्णांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

जळगाव: मंगेश रमेश चव्हाण हे जळगाव जिल्हयातील चाळीसगाव मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार आहेत. घराण्यात कोणताही राजकीय वारसा नसतांना आपल्या सामाजिक कर्तृत्वाच्या बळावर यांनी राजकारणात मजल मारली आहे. चाळीसगाव येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करीत होते. याच माध्यमातून सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होतो. 

चाळीसगाव येथे त्यांनी विविध सामाजिक उपक्रमही राबविले होते. जिल्हयातील पक्षाचा ते युवा चेहरा आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याच्या बळावरच पक्षाने त्यांना सन २०१९ च्या विधानसभा निवडकीत चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. जनसंपर्काच्या बळावर तेमोठ्या मताधिक्यांने विजयी होऊन ते प्रथमच आमदार झाले.

आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदार संघात जनसंपर्क अधिकच वाढविला. ‘कोरोना’ संसर्गाच्या काळात त्यांनी जनतेसाठी सुविधा राबविल्या. परराज्यातील लोक परतीसाठी निघाले होते,त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांनी भोजनाची सुविधा केली होती. विशेष म्हणजे राज्यातील सीमेपर्यंत जाण्यासाठी त्यांनी वाहनांची व्यवस्थाही केली होती. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात कोविड पॉझीटीव्ह रूग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमध्येही रूग्णांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत

Edited  by : Mangesh Mahale      

 

हेही वाचा : महापालिका आणि रहिवाशांना 'या' निर्णयाच होणार फायदा... 
मुंबई : घाटकोपर-विक्रोळी पार्कसाईट विभागातील महापालिकेच्या भाडेकरू इमारतींच्या पुनर्वसनानंतर 537 कुटुंबांना 300 ऐवजी 405 चौरस फुट क्षेत्रफळाची स्वमालकीची घरे देण्याचा निर्णय झाला आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार भाजप खासदार मनोज कोटक यांनी पाठपुरावा करून महापालिकेला हा निर्णय घेणे भाग पाडले. याचा फायदा मुंबईतील अशा हजारो कुटुंबांना होणार आहे. इतरत्र अशाच प्रकारे महापालिकेच्या अनेक भाडेकरू इमारती आहेत, त्यांना देखील यापुढे असाच निर्णय लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटक यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांसह विक्रोळी-पार्कसाईट बंबखाना विभागात स्वतः पाहणी केली आणि या इमारती कोठे व कशा प्रकारे बांधता येतील याच्याही सूचना केल्या. मुंबईतील महापालिका भाडेकरू इमारतींबाबत अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. इतरत्र अशाच प्रकारे महापालिकेच्या अनेक भाडेकरू इमारती आहेत, त्यांनादेखील यापुढे असाच निर्णय लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतींचे पुनर्वसन महापालिकेने केले तर उरलेल्या जागेत पालिकेला हजारो घरे मिळतील. त्यामुळे आता हीच मागणी आपण पालिकेकडे करणार आहोत, असे कोटक यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख