आजचा वाढदिवस : अमरसिंह पंडित, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस 

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे थोरले चिरंजीव अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
Today's Birthday : Amarsinh Pandit, Former MLA and State General Secretary to NCP
Today's Birthday : Amarsinh Pandit, Former MLA and State General Secretary to NCP

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे थोरले चिरंजीव अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. 

पंचायत समिती सभापतिपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अमरसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच 2004 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर गेवराई मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक म्हणूनही काम केले. 

सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहचिटणीस असून चंपावती क्रीडा मंडळ, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळासह जयभवानी सहकारी साखर कारखारा, शारदा प्रतिष्ठान आदी संस्थांचे अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

शेतकरी, मराठवाड्याचे सिंचन, कापूस बोंडआळी तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती व वैद्यकीय पूर्वपरीक्षेतील विभागनिहाय आरक्षण आदी प्रश्नांवर त्यांनी नेहमीच सरकारला धारेवर धरले. त्यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत 1800 हून अधिक सामूहिक विवाह झाले आहेत. मतदार संघात जलसिंनाची कामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. 

मराठवाड्यातील दुष्काळ, पाणी व शेती आदी विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. शेती अभ्यासासाठी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत परदेश दौरेही केले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com