0raksha_khadse_13may_f.jpg
0raksha_khadse_13may_f.jpg

आजचा वाढदिवस : रक्षा निखिल खडसे, खासदार, भाजप, रावेर

रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार आहेत.

रक्षा खडसे  Raksha Khadse या जळगाव जिल्ह्यातील रावेर Raver लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार आहेत. त्या या मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या स्नुषा आहेत. Today birthday Raksha Nikhil Khadse MP BJP Raver

रक्षा खडसे या सन 2018 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कोथळी (ता. मुक्ताईनगर) च्या त्या सरपंच होत्या. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. शिक्षण सभापती असताना त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

सन २०१४ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली व त्या खासदार झाल्या, त्यानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्या दुसऱ्यांदा याच मतदार संघातून खासदार झाल्या.

रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार  आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हिना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे या 17 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत.  रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते.  

सासरे एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर रक्षा खडसे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्य सुरू ठेवले भारतीय जनता पक्षाची भूमिका त्या अत्यंत प्रखरतेने मांडतात. 

एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनेही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले होते. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com