आजचा वाढदिवस : राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे - Today Birthday: Rajesh Deshmukh Collector Pune | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 मे 2021

पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धा राजेश देशमुख यांच्या काळात गाजली.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख Rajesh Deshmukh यांचा आज वाढदिवस. कोरोना संकटात पुणे जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. Today Birthday: Rajesh Deshmukh Collector Pune

मूळचे देवळाली (जि. उस्मानाबाद) येथील असलेले देशमुख हे पशुवैद्यकीय शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनी व्हेटर्नरी कॉलेज , परळ येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. उपजिल्हाधिकारीपदी कार्य करताना अनेकदा 'उत्कृष्ट महसूल अधिकारी' म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. पदमसिंह पाटील हे मंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात त्यांचा वाटा होता. 

शिवसेना कॅाग्रेसच्या नेत्यांची कानटोचणी करीत आहे का...आघाडी सरकारमध्ये सर्व हास्यास्पद सुरु..शेलारांचा टोला

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धा त्यांच्या काळात गाजली. सहभागी गावातील लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सकाळी ७.०० पूर्वी श्रमदानात सहभागी होणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख झाली. 

यवतमाळ येथे जिल्हाधिकारी असताना त्यांनी पीककर्ज, गावतळी पुनर्भरण, पाणंद रस्ते सुरु करणे याबाबत मोठे काम केले. हाफकिन येथे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली. पुणे जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यापासून कोरोनाला रोखण्यासाठी ते आघाडीवर राहून लढत आहेत.

यवतमाळ जिल्ह्य हा आत्महत्याप्रवण जिल्हा होता. त्यासाठी त्यांनी उत्तम नियोजन करून काम केलं. त्यामुळे चांगला परिणाम दिसून आला. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी स्वच्छता अभियान  (ODS), आणि आवास योजनेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘शरद पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्याला जबाबदार कोण?’ शिवसेनेचा सवाल...

मुंबई : काँग्रेसच्या नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी  यांच्या कामगिरीबाबत आजच्या 'सामना' मधून कैातुक करण्यात आले आहे. कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं आहे. "आज कॅाग्रेसमध्ये शरद पवार  यांच्यासारखे नेते नाहीत, याला जबाबदार कोण," असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखात उपस्थित केला आहे.  "राहुल गांधी हेच आज काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून भारताला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले त्यावर मंथन झाले,  " अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखात राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख