आजचा वाढदिवस : संदीप क्षीरसागर (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, बीड)

संदीप क्षीरसागर २०१९ साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरुन विजयी देखील झाले.
4Sandip_20Kshirsagar_20Birthday.jpg
4Sandip_20Kshirsagar_20Birthday.jpg

बीड : बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप रविंद्र क्षीरसागर Sandeep Kshirsagar हे दिवंगत लोकनेत्या माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे नातू आहेत. पंचायत समितीचे पाच वर्षे सभापती, जिल्हा परिषदेचे पाच वर्षे सभापती राहीलेले संदीप क्षीरसागर २०१९ साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरुन विजयी देखील झाले. 

त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवून काका शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. मागच्या नगर पालिका तसेच जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान देत संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून वरिल दोन्ही निवडणुका लढविल्या. 

नगर पालिका निवडणुकीत त्यांचे बंधू हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष झाले. तसेच पंधरावर नगरसेवक विजयी करण्यात त्यांना यश आले. जिल्हा परिषदेतही ते स्वत: आई रेखा क्षीरसागर यांच्यासह त्यांचे इतर एक समर्थक विजयी झाला. बीड पंचायत समितीही त्यांच्या नेतृत्वाखाली आहे. मतदार संघातील युवकांची मोठी फळी त्यांनी उभा केली आहे. शहरात विना वर्गणी गणेश उत्सवाची परंपराही त्यांनी सुरु केली आहे.

शिवसेनेनं राणेंना डिवचलं ; ED टाळण्यासाठी BJP मध्ये गेले..'फाईल' बंद!
मुंबई : ''जेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही, त्या राज्यांत ईडी अधिक सक्रीय होत आहे, हा काय फक्त योगायोग समजायचा?' असा सवाल करत शिवसेनेने Shiv Sena भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्रिय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ''महाराष्ट्रात ईडीचा ED ससेमिरा टाळण्यासाठी काही पुढारी भाजपमध्ये गेले व थेट केंद्रात मंत्रीच झाले. भाजपमध्ये जाताच 'फाईल' बंद!' अशा शब्दात शिवसेनेनं राणेंना डिवचलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com