आजचा वाढदिवस : संदीप क्षीरसागर (आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, बीड) - Beed NCP Mla Sandip Kshirsagar Birthday Today | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : संदीप क्षीरसागर (आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, बीड)

दत्ता देशमुख
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

ता. २७ ऑगस्ट - आमदार संदीप क्षीरसागर यांचा आज वाढदिवस

बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप रविंद्र क्षीरसागर हे दिवंगत लोकनेत्या माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांचे नातू आहेत. पंचायत समितीचे पाच वर्षे सभापती, जिल्हा परिषदेचे पाच वर्षे सभापती राहीलेले संदीप क्षीरसागर पहिल्याच निवडणुकीत विधानसभेला विजयी झाले.

मागच्या नगर पालिका तसेच जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान देत संदीप क्षीरसागर यांनी काकू - नाना विकास आघाडीच्या माध्यमातून वरिल दोन्ही निवडणुका लढविल्या. 

नगर पालिका निवडणुकीत त्यांचे बंधू हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष झाले. तसेच पंधरावर नगरसेवक विजयी करण्यात त्यांना यश आले. जिल्हा परिषदेतही ते स्वत: आई रेखा क्षीरसागर यांच्यासह त्यांचे इतर एक समर्थक विजयी झाला. बीड पंचायत समितीही त्यांच्या नेतृत्वाखाली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवत यश मिळविले. मतदार संघातील युवकांची मोठी फळी त्यांनी उभी केली आहे. शहरात विन वर्गणी गणेश उत्सवाची परंपराही त्यांनी सुरु केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख