Sangli MLA Mohanrao Kadam Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : मोहनराव कदम, आमदार सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघ

संपत मोरे
सोमवार, 15 जून 2020

सांगली जिल्ह्यात डॉ पतंगराव कदम आणि मोहनराव कदम या दोन भावांनी विकासाचे राजकारण उभे केले.माणसं घडवली.अनेक कार्यकर्ते घडवले. १९७८ पासून कदम कुटुंब राजकारणात सक्रीय आहे.मोहनराव कदम यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी प्रमुख पदावर काम केल्यावर आज ते विधानपरिषद सभागृहात काम करत आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे

सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांचा प्रवास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाला आहे. सर्व सेवा सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची कारकीर्द सुरू केली. एका गावातील सोसायटीचे सचिव ते आमदार हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे.

कडेगाव तालुक्यातील सोनसळ या गावात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्म झालेल्या मोहनराव कदम यांनी आयुष्यात कठोर परिश्रमच्या बळावर राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळवले. त्यांचे बंधू राज्याचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या राजकीय वाटचालीत मोहनराव कदम यांचे मोठे योगदान होते. मोहनराव कदम यांनी त्यांच्या सोनसळ गावचे सरपंच,खानापूर पंचायत समितीचे सभापती, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या पदावर काम केले आहे. सांगली जिल्ह्यात सर्व तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे 

सोसायटीचे सचिव म्हणून सहकार क्षेत्रात प्रवेश केलेले मोहनराव कदम आज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पण त्यांचे अनेक कार्यकर्तेही सहकारी संस्थाचे चेअरमन आहेत.त्यांच्या प्रेरणेतून अनेक सहकारी संस्था उभा राहिल्या आहेत. कदम अनेक संस्थाचे  प्रेरणास्थान आहेत.

सांगली जिल्ह्यात डॉ पतंगराव कदम आणि मोहनराव कदम या दोन भावांनी विकासाचे राजकारण उभे केले.माणसं घडवली.अनेक कार्यकर्ते घडवले. १९७८ पासून कदम कुटुंब राजकारणात सक्रीय आहे.मोहनराव कदम यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी प्रमुख पदावर काम केल्यावर आज ते विधानपरिषद सभागृहात काम करत आहेत. कसलीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे,सतत कष्ट करणे,सामान्य लोकांना मदत करणे हा कदम कुटुंबाचा राजकीय पॅटर्न आहे. मोहनराव कदम तोच पॅटर्न राबवत वयाच्या ८१ व्या वर्षी लोकसेवेत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख