10-12 ला मिळणारी तंबाखूची पुडी आता 50 रुपयाला ! टपऱ्या फोडल्या !

जी तंबाखू सहज कुठे आणि कधीही दहा-बारा रुपयाला (चुन्यासह तेरा रुपये) मिळत होती तिचे आता दर्शनही मिळत नाही. दर्शन झाले तर त्यासाठी पाचपट पैसे मोजावे लागत आहेत.
10-12 ला मिळणारी तंबाखूची पुडी आता 50 रुपयाला ! टपऱ्या फोडल्या !

पुणे : लॉकडाऊनमुळे तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहे. ही तंबाखू बहुसंख्य लोक खातात. गाय छापच्या पुडीची किंमत तशी दहा रुपये आहे पण, आता तिच पुडी मिळत नाही. मिळाली तर तिला चक्क पाचपट पैसे अधिक मोजावे लागत आहेत. म्हणजे कुठे तीस, चाळीस तर कुठे पन्नास रुपये देऊत पुडी खरेदी करताना दिसतात. 

तंबाखू खाण्याचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. ग्रामीण भागात तंबाखूचे व्यसन इतके असते की उठल्या उठल्या पुडी आणि चुना हातात असतो. आता हीच तंबाखूची पुडी मिळणे कोरोनामुळे बंद झाली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही तंबाखूच्या पुड्या पानपट्टी बंद असल्याने मिळत नाहीत. मिळालीच तर तिची किंमत ऐकून तंबाखू खाऊ की नको अशी अवस्था व्यसन असणाऱ्यांची झाली आहे. 

लॉकडाऊन असल्यामुळे मद्य मिळत नाही म्हणून काही तळीरामांनी दारूची दुकाने फोडली होती. आता धूम्रपानप्रेमींनी टपऱ्या फोडण्यास सुरुवात केली आहे. दादर, अंधेरी येथील पानटपरी चालकांनी चोरीच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. 

जी तंबाखू सहज कुठे आणि कधीही दहा-बारा रुपयाला (चुन्यासह तेरा रुपये) मिळत होती तिचे आता दर्शनही मिळत नाही. दर्शन झाले तर त्यासाठी पाचपट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तंबाखू सहज कोणीही कोणाला खायला देणारी मंडळी आता चिमटभरही तंबाखू द्यायला तयार नाहीत असे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. पुण्याच उपनगरात ही गाय छाप तीस रुपयांना चोरून मिळते. 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मद्यप्रेमींप्रमाणे तंबाखू-गुटखा खाणारे आणि धूम्रपान करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. सिगारेटच्या एका पाकिटसाठी काळ्याबाजारात 100 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत.

तंबाखूच्या पुडीची किंमत 50 रुपयांवर गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर अंधेरीतील घाटकोपर लिंक रोड येथील साटमवाडी भागातील सीताराम गुजर यांच्या टपरीतून सिगारेट चोरीला गेल्या. 

तंबाखू खाणे आरोग्यास धोकादायक आहे असा इशारा या पुडीवर लिहिलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून तंबाखूचे सेवन करणारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखूची मिशारी करणाऱ्या महिला आणि पुरूषही पाहण्यास मिळतात. तंबाखू काही गरीब खात नाहीत तर श्रीमंत तंबाखू नाही मिळाली तर बैचैन होतात. कोरोनाने मात्र व्यसनी मंडळींच्या व्यसनावर काही प्रमाणात मर्यादा आणल्या आहेत हे ही तितकेच खरे ! 

सोमवारी त्यांच्या आईला टपरीचा मागील बाजूचा पत्रा उचकटल्याचे दिसले. त्यानंतर गुजर यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता, सिगारेटची 450 पाकिटे आणि चॉकलेट असा 65 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले. त्यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

प्रभादेवी परिसरातील नागो सयाजीची वाडी येथील सदानंद कोंडविलकर यांच्या पानाच्या टपरीतून सिगारेटचा साठा लंपास करण्यात आला. टपरीतील दिवा सुरू असून, दरवाजा उघडा असल्याची माहिती एका स्थानिकाने दादरमध्ये राहणाऱ्या कोंडविलकर यांना दूरध्वनीवरून दिली.

त्यानंतर त्यांनी टपरीवर जाऊन पाहिले असता 1000 रुपये आणि 5000 रुपयांच्या सिगारेट गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com