तिवसा : यशोमती ठाकूर यांना प्रवीण पोटेंचे आव्हान !

तिवसा मतदारसंघात संपर्क वाढविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे प्रवीण पोटे यांनी मान्य केले आहे .
Pote-Thakur.
Pote-Thakur.

अमरावती :  अमरावतीच्या तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना निवडणूक लढवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी  दिल्याची माहिती आहे.

प्रवीण पोटे यांनी अधिकृतपणे याबाबत बोलण्यास नकार दिला असला तरी  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या चर्चेलात्यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत तिवसा मतदार संघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे प्रविण पोटे असा सामना रंगणार असे दिसते . 

या  मतदार संघात प्रवीण पोटे यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात रणनीती आखाखला सुरुवात केली आहे.

जे पारंपरिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात आहेत, त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत करून  तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत असे समजते . 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ हा मागील गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या ताब्यात आहे.2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा येथे भाजपच्या निवेदिता चौधरी या पराभूत झाल्या होत्या.

त्यानंतर आता 2019 मध्ये सुद्धा 2014 ची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी यशोमती ठाकूर यांना शह देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण पोटे-पाटील यांना तयारीला लागण्यास सांगितले असल्याचे समजते .

तिवसा मतदारसंघात संपर्क वाढविण्याचे  आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे प्रवीण पोटे यांनी मान्य केले आहे . 

यशोमती ठाकूर या महाराष्ट्र  आहेत. राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क साधू शकणाऱ्या  त्या  आहेत. विधानसभेत त्या राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेत असत . आगामी काळात जर प्रवीण पोटे यांनी तिवसा मतदारसंघात निवडणूक लढवली, तर ही निवडणूक यशोमती ठाकूर आणि प्रवीण पोटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com