Tiroda BDO : ACB trap | Sarkarnama

तिरोड्याचे बीडीओ जावेद इनामदारांकडे सापडली ७८ लाखांची अपसंपदा  

सरकारनामा
गुरुवार, 9 मे 2019

अकोला:  अकोला जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तथा तिरोडा (जि. गोंदिया) येथील विद्यमान गटविकास अधिकार जावेद इनामदारवर बुधवारी अकोला येथे अपसंपदा जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला:  अकोला जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तथा तिरोडा (जि. गोंदिया) येथील विद्यमान गटविकास अधिकार जावेद इनामदारवर बुधवारी अकोला येथे अपसंपदा जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहात अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिंबंधक विभागाने केलेल्या चाैकशीत त्यांच्याकडे ज्ञात स्त्रोतापेक्षा 80 टक्के अधिक म्हणजे 78,15,627 रुपयांची बेहिशाेबी (अपसंपदा) मालमत्ता आढळून आली आहे. आराेपींमध्ये त्याच्यासह त्याच्या पत्नीचाही समावेश आहे .  इनामदारला 19 ऑक्टोबर  2015 राेजी 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले  हाेते.

अकोला जिल्हा परिषदेचे तत्कालीन डीसीईओ जावेद इनामदार हा सांगली जिल्ह्यातील मिरज येथे देवल काॅम्लेक्स जवाहर चाैक, गाेठण गल्लीतील रहिवाशी अाहे. त्याला अकोला येथे आॅक्टोबर 2015 मध्ये तेल्हारा पंचायत समितीतील दोन कर्मचाऱ्यांकडून गृहकर्ज मंजुरीसाठी लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्यानंतर एसीबीतर्फे त्याचे कार्यालय, घराची झडती घेण्यात आली.

या झडतीमध्ये मालमत्ता व दस्ताएवज अाढळूनआले  हाेते. त्यामुळे त्याच्या मालमत्तेची सत्यस्थिती निष्पन्न हाेण्यासाठी एसीबीकडून सविस्तर चाैकशी करण्यात आली . या चाैकशीत आरोपी जावेदकडे ज्ञात स्रोताच्या 80.86 टक्के अर्थात 78,15,627 रूपयांची अपसंपदा (बेहिशाेबी मालमत्ता) मिळून आली.

ही मालमत्ता संपादित करण्यास त्याची पत्नी हुस्ना जावेद इनामदार (वय 52 वर्षे. रा.मिरज) हीनेही साहाय्य केल्याने ितच्यावरही गुन्हा दाखल करण्यात अाला. गुन्हा 3(1)(इ)सहकलम 13(2) लाप्रका, क.109 भादंिव अन्वये नाेंदवण्यात अाला. तपास एसीबीचे उपअधीक्षक संजय गोर्ले यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख