this time is not earning for money but helping for poors, says mp jalil | Sarkarnama

`ही वेळ पैसे कमावण्याची नाही, तर गरिबांना मदत करण्याची` #fightagainstcorona

जगदिश पानसरे
गुरुवार, 26 मार्च 2020

इम्तिआज जलिल यांनी खरेच योग्य सल्ला दिला आहे. त्यावर सर्वांनीच विचार करायला हवा. 

औरंगाबाद : देशावर ,राज्यावर आणि शहरावर कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे, अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना दोन घास मिळावे यासाठी सामाजिक संस्था, राजकीय संघटना झटत आहेत .मात्र अशावेळीही काही व्यापारी धान्यांचे भाव वाढवून नफेखोरी करू पाहत आहेेत. ही वेळ पैसे कमावण्याची नाही तर आपल्या जवळचा पैसा खर्च करून गरिबांना मदत करण्याची आहे असा सणसणीत टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून इम्तियाज जलील घरी बसूनच जनजागृती आणि गोरगरिबांना अन्नधान्य व इतर मदत पोहोचवत आहेत. गरिबांसाठी अन्नधान्य खरेदी करताना आलेला अनुभव त्यांनी सांगितला.

इम्तियाज जलील म्हणाले, गरिबांसाठी धान्य खरेदी करताना मोंढ्यातील काही व्यापारी भाव वाढले आहे असे सांगून जास्त पैसे उकळत आहेत, अशा नफेखोरी करू पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो,परिस्थिती काय आहे आणि आपण वागतो कसे याचे भान राखले पाहिजे? आज अनेक लोक ज्यांचे पोट हातावर आहे अशा गरजूंना पदरमोड करून मदतीसाठी पुढे येत आहेत .

कोरोनाचे संकट मोठे आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी .या काळात आपण केलेली मदतच कायम लक्षात राहील. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे अशी कानउघाडणी देखील इम्तियाज जलील त्यांनी केली 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख