Thundershowers hit Nashik District | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

नाशिकच्या शेतक-यांवर अस्मानी हल्ला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 मे 2017

देवळ्यात वीज,गारपिट घर पडून 8 जण जखमी
नामपूर,द्याने,देवळ्यात गारपिटीने मोठे नुकसान
निफाडला चेहेडीत द्राक्ष,कांदे उसावर गारांचा थर
नांदूर-शिंगोटे-पांढुर्ली भागात पावसाने नुकसान

नाशिक - दोन दिवस उन्हाच्या कडाक्‍यापासून सावध राहण्याच्या सुचना दिल्या गेल्या असतानाच, काल दुपारी दोनपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या गारपिटीने जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झाले. गारपिट, वीज आणि घर पडण्याने देवळा तालुक्‍यात 8 जण जखमी झाले. सिन्नर, देवळा, नामपूर, सटाणा भागातील पिकांवर गारांचे थर साचले होते.

सिन्नर नामपूर, द्याने देवळा तसेच पांढुर्ली तसेच बेज मंडलातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. इतर भागात केवळ वातावरण बदलासह तुरळक स्वरुपाच्या सरी पडल्या पण देवळ्यासह काही भागात गारांसह आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. त्यामुळे द्याने, नामपूर, चांदवड, सटाणा, पांढुर्ली भागात जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. डाळींब, द्राक्ष बागायती पिकांच्या शेतकऱ्यांची गाळण उडाली. टपोऱ्या गारा आणि सोबत जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोपडून काढले. बरोबर दुपारी दोनला देवळा तसेच नामपूर भागात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पंचक्रोशीतील विविध गावात आर्धा ते पाउन तास मुसळधार स्वरुपात पावसाने हजेरी लावली.

8 जण जखमी
गारपिटीने पिकांचे नुकसान केलेच, सोबतच झिरे पिंपळे (ता.देवळा) येथे एकनाथ यशवंत सोनवणे (वय 27) हे वीज पडून जखमी झाले. यशवंत राम सोनवणे यांच्या 4 शेळ्यांचा मृत्यू झाला. देवळा शिवारात झिरे पिंपळ गावात हेमंत आहेर यांचे घर पडून कुटुंबातील चौघे जखमी झाले. त्यात, प्रमिला हिरामण आहेर (वय 35), कुणाल हेमंत आहेर (वय 7) कल्याणी हेमंत आहेर (वय 5), माउ दिपक आहेर (वय 4) याशिवाय देवळ्यात माधुरी पवार (वय 25) सिमा सचिन जाधव (वय 35) हे जखमी झाले. काल उशीरापर्यत शहर जिल्ह्यातील नुकसानीची माहीती घेण्याचे काम सुरु होते.

वातावरण बदलाने इतर तालुक्‍यात थोड्या आधिक फरकाने तुरळक स्वरुपाचा पाउस झाला. मनमाड, नांदगाव, निफाड भागात केवळ वातावरण बदलले. सिन्नर तालुक्‍यातील पांढुर्ली शिवारात तसेच इगतपुरी व सिन्नर तालुक्‍याच्या सिमावर्ती भागातील गावांमध्ये मात्र अल्पशा स्वरुपात लहान थेंबासह पाउस झाला. काही भागात गाराही पडल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख